शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती शौर्य पदक विजेत्या अग्निशामक दलाच्या जवानाला आग विझविताना मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 15:02 IST

राष्ट्रपती शौर्य पदक विजेत्या जवानाला मारहाण करण्याचा खळबळजनक प्रकार टिंगरेनगर येथे मध्यरात्री घडला़.

पुणे : टिंगरेनगर येथे कचऱ्याला लागलेली आग विझवित असताना आमच्या हद्दीतील आग विझविण्यास कोणी सांगितले ; असे म्हणून एकाने राष्ट्रपती शौर्य पदक विजेत्या जवानाला मारहाण करण्याचा खळबळजनक प्रकार टिंगरेनगर येथे मध्यरात्री घडला़. विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. राजाराम बबन टिंगरे (वय ५७) आणि सुरज राजाराम टिंगरे (रा़ मुंजाबावस्ती, धानोरी, विश्रांतवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़. या प्रकरणी सुनिल सोपान देवकर (वय ५३, रा़. नवी खडकी, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, येरवडा अग्निशमन केंद्रात ते ड्युटीवर असताना विमाननगर येथील एका शोरुमला आग लागल्याचा कॉल होता़. तेथील काम पूर्ण करुन रात्री पावणे बारा वाजता ते परत येत असताना त्यांना धानोरी येथे कचऱ्याला आग लागली असल्याचा कॉल आला़. ते त्याठिकाणी सुनिल टिंगरे यांच्या बंगल्यासमोर आगीच्या ठिकाणी पोहचले़ व आग विझवण्याचे काम सुरु केले़. त्यावेळी तेथे राजाराम टिंगरे हे आले़ ते अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करु लागले़. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करुन काम करीत असताना दत्ता माने यांनी त्यांना समजावून परत पाठविले़ ते पुन्हा आले़. त्यांचा मुलगा सुरजही शिवीगाळ करु लागला़. त्यांनी देवकर यांच्या हातातील पाईप ओढण्याचा प्रयत्न करु लागला़ ही जागा माझ्या मालकीची आहे़. तुम्हाला येथे कोणी बोलावले ते सांगा, असे म्हणून देवकर यांच्या अंगावर धावून गेले़. त्यांचा शर्ट ओढून हाताने मारहाण करु लागले़. त्यात देवकर यांच्या शर्टची पाच बटणे तुटली. तसेच त्यांच्या पोटात लाथ मारली़ तोपर्यंत पोलीस  तेथे आले व त्यांनी दोघांना ताब्यात घेतले़. 

टॅग्स :Puneपुणेfire brigade puneपुणे अग्निशामक दलCrime Newsगुन्हेगारी