शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

गर्भवती वाघिणीची झाली शिकारच; हत्येप्रकरणी पोलिसांनी बापलेकांना घातल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 21:04 IST

Pregnant tigerness had hunted :  काही आरोपी फरार, नख आणि वाघिणीचे पंजे जप्त

ठळक मुद्देया प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके व वनविभागाची चार पथके गठित केली होती.

वणी(यवतमाळ) : गर्भवती वाघिणीला गुहेत डांबून भाल्यासारख्या तीक्ष्ण हत्याराने तिला ठार मारल्याच्या घटनेतील आरोपी असलेल्या बापलेकांना अखेर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी बेड्या ठोकल्या. अशोक लेतू आत्राम (२०), लेतू रामा आत्राम (४५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पाटण पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पांढरवाणी या गावातून या दोघांना उचलण्यात आहे. यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी शुक्रवारी रात्री पांढरकवडा पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.या पत्रकार परिषदेला यवतमाळचे पालकमंत्री संदिपान भुमरे, खासदार सुरेश धानोरकर, यवतमा‌ळचे मुख्य वनसंरक्षक एस.व्ही.रामाराव, वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप ठाकरे, पांढरकवडाचे ठाणेदार रामकृष्ण महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते. हा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेसी, मुकुटबनचे ठाणेदार धर्माजी सोनुने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ऋषी ठाकूर यांनी मोलाची कामगिरी बजावल्याचा उल्लेखही डॉ.भुजबळ यांनी यावेळी केला. या कारवाईत एक वाघ नख व ‌वाघिणीचा एक पंजा पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींनी हा पंजा घटनास्थळ परिसरात दडवून ठेवला होता. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असून मृत वाघिणीचा एक पंजा व नऊ नखे जप्त करायची आहेत. त्यासाठी पोलिसांची व वन विभागाची चमू रवाना करण्यात आल्याची माहितीही डॉ.भुजबळ यांनी दिली. शिकारीच्या उद्देशानेच वाघिणीला ठार मारण्यात आल्याचे डाॅ.भुजबळ यांनी सांगितले.

मुकूटबन वनपरिक्षेत्रातील राखीव वन कक्ष क्रमांक ३० मध्ये एका नाल्याच्या काठावर असलेल्या गुहेत २५ एप्रिल रोजी गर्भवती वाघिण मृतावस्थेत आढळून आली होती. त्यानंतर वन अधिकार्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यावेळी वाघिणीच्या पुढील पायाचे दोन्ही पंजे तोडून नेण्यात आल्याचे दिसून आले. तीन दिवस उलटूनही वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कोणतेही धागेदोरे गवसत नसल्याने अखेर २८ एप्रिलला जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.दिलीप भूजबळ पाटील हे वनविभागाच्या मदतीला धाऊन आले. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके व वनविभागाची चार पथके गठित केली होती.

टॅग्स :TigerवाघYavatmalयवतमाळArrestअटकPoliceपोलिस