नागपुरात प्रीतीच्या फरार साथीदारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:58 IST2020-07-09T00:56:42+5:302020-07-09T00:58:40+5:30
अवैध सावकार आणि प्रीती दासने धमकावल्यामुळे एका युवकाने केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणातील तिसरा फरार आरोपी मंगेश पौनीकर याला गुन्हे शाखेने अटक केली. याअगोदर सतीश सोनकुसरे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर प्रीतीला अंतरिम जामीन मिळालेला आहे.

नागपुरात प्रीतीच्या फरार साथीदारास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवैध सावकार आणि प्रीती दासने धमकावल्यामुळे एका युवकाने केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणातील तिसरा फरार आरोपी मंगेश पौनीकर याला गुन्हे शाखेने अटक केली. याअगोदर सतीश सोनकुसरे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर प्रीतीला अंतरिम जामीन मिळालेला आहे.
सतीशने जुनी मंगळवारी येथील सुनील पौनीकरला पाच ते सहा लाख रुपये दिले होते. पैसे परत न केल्याने सतीश दुखावला होता. तो प्रीती आणि मंगेशसोबत सुनीलच्या घरी गेला होता. तिघांनी सुनीलच्या कुटुंबीयांना धमकावीत गंभीर परिणाम भोगण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सुनीलने आत्महत्या केली होती. लकडगंज पोलिसांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याऐवजी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. प्रीती दासचे खरे कृत्य उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेने मंगळवारी मंगेशला अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.