शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

Atul Subhash : हॉटेलची खोली... डॉक्टर आणि नर्स बनले पोलीस; निकिताच्या घरच्यांना कशी झाली अटक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:06 IST

Atul Subhash : निशा आणि तिचा मुलगा अनुराग सिंघानिया यांना पोलिसांनी अटक केली.

एआय इंजिनिअर अतुल सुभाषच्या आत्महत्येप्रकरणी वाँटेड असलेली अतुल सुभाषची सासू निशा आणि तिचा मुलगा अनुराग सिंघानिया यांना ११ डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी अटक केली. प्लॅननुसार, बंगळुरू पोलिसांनी आई आणि मुलगा ज्या हॉटेलमध्ये राहत होते त्याच हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक केल्या होत्या. रात्रभर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर सकाळी त्यांना पकडण्यात आलं आणि त्यानंतर वाराणसीमार्गे विमानाने ते बंगळुरूला पोहोचले.

मेहुणा अनुराग जौनपूर येथील घराला कुलूप लावून फरार झाला. यानंतर दोघेही झुंसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेलमध्ये पोहोचले आणि रूम घेऊन थांबले. याच दरम्यान, जौनपूर व इतर ठिकाणांहून शोधकार्यात गुंतलेल्या पोलिसांना अचूक माहिती मिळाली. त्यानंतर १३ डिसेंबर रोजी बंगळुरू पोलिसातील दोन पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले.

पोलिसांनी रात्रभर दोघांवर ठेवली नजर 

डॉक्टर आणि नर्स असल्याचं सांगून त्यांनी स्वतंत्र खोल्या बुक केल्या. रात्री आई आणि मुलाच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली आणि शनिवारी सकाळी पोलिसांचं पथक आरोपींच्या खोलीत दाखल झालं. सुमारे दोन तास चौकशी केल्यानंतर पोलिसांचं पथक आरोपींसोबत वाराणसीला रवाना झालं. १२ डिसेंबर रोजी आरोपींच्या वतीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता, पोलिसांना त्याचा सुगावा लागला आणि त्यानंतर लोकेशन ट्रेस करून कारवाई केली, असंही सांगण्यात आलं.

बंगळुरू पोलिसांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये निशा आणि अनुरागच्या अटकेचा उल्लेख केला आहे. याबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय आरोपींचा न्यायालयाकडून रिमांडही घेण्यात आलेला नाही. प्रयागराज पोलीस अधिकारीही याबाबत काहीही बोलण्याचे टाळत आहेत.

बंगळुरू पोलिसांच्या टीमसोबत जौनपूरला आलेले एसआय रंजीत कुमार यांनी सांगितलं की, शनिवारी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बंगळुरू पोलिसांनी प्रयागराज आणि गुरुग्राम येथून आरोपींना २४ तासांच्या आत बंगळुरू न्यायालयात हजर केले. तेथून सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूरPoliceपोलिस