शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
4
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
5
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
6
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
7
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
8
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
9
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
10
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
11
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
12
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
13
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
14
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
15
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
16
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
17
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
18
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
19
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
20
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

Breaking: प्रताप सरनाईक यांच्या जवळच्या मित्राला अटक; टॉप ग्रुपचे आर्थिक गैरव्यवहार प्रकरण भोवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 07:53 IST

Pratap Sarnaik : ईडीची कारवाई, विहंगलाही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

मनीषा म्हात्रे

मुंबई : टॉप ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चंडोले यांना अटक करण्यात आले आहे. याप्रकरणातील ही पहिली अटक आहे. १२ तासांच्या चौकशीनंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंगला आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही ईडीने दिले आहे. 

     मुंबईतल्या सुरक्षा रक्षकांचे कंत्राट एमएमआरडीएला देण्यात आले होते. याचे सब कंत्राट चंडोले याच्या टॉप्स ग्रुपच्या खासगी सुरक्षा कंपनीला देण्यात आले होते. यातील १७५ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी ठाण्यात करण्यात आलेल्या छापेमारी दरम्यान हाती लागलेल्या कागदपत्रांच्या आधारे चंडोले कनेक्शन उघड़ झाले. त्यानुसार बुधवारी त्यांच्याकडे १२ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

 

 चंडोले हे सरनाईक यांचे प्रवक्ता असल्याचेही समजते. तसेच आता टॉप्स ग्रुप आणि विहंग ग्रुप मधील आर्थिक व्यवहाराबाबत ईडी अधिक तपास करत आहे.

     सरनाईक यांनी ईडीकड़े पत्र पाठवून पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी बोलाविण्याची विनंती केली. यात, परदेशातून आल्यामुळे कोविड १९ नियमांनुसार ते विलगिकरणात आहे. तर विहंग याची पत्नी अनामिका यांना हायपर टेन्शनमुळे ज्यूपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे विहंग तिच्या सोबत असल्याने, चौकशीसाठी हजर राहणे शक्य नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. सरनाईक यांच्या मेहुण्यामार्फ़त हे पत्र ईडीच्या अधिकाऱ्यांकड़े देण्यात आले. तसेच ईडीच्या चौकशीला पुर्ण सहकार्य करणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहेत.

           मात्र विहंग यांना आज चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीकड़ून सांगण्यात आले आहे. अशात चंडोले यांच्या अटकेमुळे सरनाईक यांच्या अडचणीत वाढ झाल्याचेही समजते. 

क़ाय आहे प्रकरण ? 

टॉप समूहाच्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी कंपनी आणि कंपनीचे संस्थापक राहुल नंदा यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार आणि विदेशी चलन विषयक आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप केले होते.  याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश देण्याची मागणी त्यांनी दंडाधिकाऱ्यांनी कडे केली. ऑक्टोबरमध्ये यलागेट पोलीस ठाण्यात  राहुल नंदा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करत, हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकड़े वर्ग करण्यात आला होता. यात १७५ कोटीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता.

कंपनीचे मॉरिशस येथे स्थापन केलेल्या संस्थेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. तसेच दहा वर्षांपूर्वी ब्रिटनमधील एका कंपनीने सुमारे दीडशे कोटींची गुंतवणूक केली या दोन्ही व्यवहारांमध्ये आरबीआयच्या विदेशी चलन विषयक नियमांचे उल्लंघन करण्यात आले असा आरोप दोन अधिकाऱ्यांनी केला होता. याच गुह्यांच्या आधारावर गुन्हा नोंद करत ईडीने तपास सुरु केला. कंपनीचे संस्थापक राहुल नंदा आणि प्रताप सरनाईक हे मित्र आहे.  त्यांच्या व्यवसायात सरनाईक यांची गुंतवणूक आहे का ? हे पडताळण्यासाठी चौकशी केल्याचे समजते.  मात्र नंदा यांनी याबाबतचे सर्व आरोप फेटाळले आहे. तसेच प्रताप आणि आपल्यात फक्त मैत्रीचे संबंध असल्याचे सांगितले. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयArrestअटकShiv Senaशिवसेना