शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र एटीएसची दमदार कामगिरी; आंध्र प्रदेशकडून रोख बक्षिस जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 15:31 IST

आंध्रप्रदेश सरकारने या माओवाद्यांवर असलेली बक्षिसाची रक्कम महाराष्ट्र एटीएसला देण्याचं जाहीर केलं आहे.

ठळक मुद्दे अनेक नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळून महाराष्ट्र एटीएसने दमदार कामगिरी बजावली आहे. वेणुगोपालनवर आंध्र प्रदेशमध्ये २०१२ पासून ८ लाखांचं बक्षीस सरकारने जाहीर केलं होतं.   ७ माओवाद्यांवर तेथील सरकारने आठ लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

मुंबई - राज्यांतील काही जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला असताना या नक्षलवाद्यांवर कारवाईसाठी स्थानिक पोलीस ठाण्यांबरोबरच महाराष्ट्रएटीएसने पुढाकार घेतला आहे. अनेक नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळून महाराष्ट्रएटीएसने दमदार कामगिरी बजावली आहे. त्यातच आंध्र प्रदेश येथे मोस्टवाॅन्टेड असलेल्या ७ माओवाद्यांना पकडल्याप्रकरणी आंध्रप्रदेश सरकारने या माओवाद्यांवर असलेली बक्षिसाची रक्कम महाराष्ट्र एटीएसला देण्याचं जाहीर केलं आहे.मागील अनेक वर्षांपासून आंध्र प्रदेशात घातपाताच्या कारवाया करणाऱ्या ७ माओवाद्यांवर तेथील सरकारने आठ लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. हे माओवादी मुंबईतील पूर्व उपनगरात लपून बसल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. त्यानुसार महाराष्ट्र एटीएसचे पोलिस उपायुक्त मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके, पोलीस निरीक्षक संजय मराठे, भास्कर कदम यांच्यासह पथकातील पोलिसांनी सापळा रचून या ७ माओवाद्यांना अटक केली होती. अटक माओवाद्यांमध्ये माओवादी नेता कृष्णा लिंगैय्या घोषका उर्फ वेणुगोपालन याचाही समावेश होता. माओवादी नेता वेणुगोपालन व्यतिरिक्त एटीएसने सत्य नारायन कर्रेल्ला, बाबू वांगुरी, शंकरय्या गुंडे, रवि मारमपेल्ली, रमेश गोलाला, नरसय्या जुम्पाला आणि सैदुल सिंगपंगा यांनाही अटक केली होती. वेणुगोपालनवर आंध्र प्रदेशमध्ये २०१२ पासून ८ लाखांचं बक्षीस सरकारने जाहीर केलं होतं. मुंबईत राहून हे माओवादी गुजरात आणि महाराष्ट्रातील माओवादी विचारधारणेतील तरुणांना एकत्र करून माओवादी संघटनांचा प्रचार आणि प्रसार वाढवण्याचे काम करत होते.

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसPoliceपोलिसAndhra Pradeshआंध्र प्रदेशMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारArrestअटक