लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : फेसबुक मॅसेंजरवर अश्लिल व्हिडीओ टाकणाऱ्या नांदेड येथील एका इसमाविरुध्द शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत शेगाव येथील शिवाजी नगर येथील महिलेने तक्रार दिली. त्यामध्ये त्यांच्या पतीने मुलांच्या अभ्यासासाठी अॅन्ड्राईड मोबाईल घेऊन दिला आहे. त्यावर त्यांच्या पतीच्या नावे फेसबुक अकाऊंट असून अनेक फेसबुक फ्रेंड आहेत. महिलेचा पती नेहमी मुलांचे व पत्नीचे फोटो फेसबुकवर टाकतो. दरम्यान १६ एप्रिल रोजी नांदेड येथील टि .पी. वाघमारे नामक व्यक्तीने महिलेच्या मोबाईलवरील फेसबुक मॅसेंजरवर हाय असा मॅसेज पाठविला. त्यानंतर त्याने या महिलेचा फेसबुकवरील एक गाऊन घातलेला फोटो सेंड करुन खुप छान दिसतेस, असा मॅसेज पाठविला. तसेच थोड्याच वेळाने त्याने दोन अश्लिल व्हिडीओं सेंड केले. याबाबत त्याला मॅसेज करुन विचारणा केली असता त्याने पुन्हा अश्लिल मॅसेज केले. या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी नांदेड येथील टी. पी. वाघमारे याच्याविरुध्द कलम ६७(अ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम सहकलम ५०९ भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
महिलेच्या फेसबुक मॅसेंजरवर अश्लील व्हिडिओ; नांदेड येथील इसमावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 11:52 IST
Pornographic videos on the woman's Facebook messenger : फेसबुक मॅसेंजरवर अश्लिल व्हिडीओ टाकणाऱ्या नांदेड येथील एका इसमाविरुध्द शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महिलेच्या फेसबुक मॅसेंजरवर अश्लील व्हिडिओ; नांदेड येथील इसमावर गुन्हा दाखल
ठळक मुद्देटि .पी. वाघमारे नामक व्यक्तीने महिलेच्या मोबाईलवरील मॅसेंजरवर मॅसेज पाठविला. महिलेचा फेसबुकवरील फोटो सेंड करुन खुप छान दिसतेस, असा मॅसेज पाठविला. तसेच थोड्याच वेळाने त्याने दोन अश्लिल व्हिडीओं सेंड केले.