शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय हत्या की आत्महत्या! नंदीग्राममध्ये घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 15:52 IST

Murder or Suicide : पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी नंदीग्रामच्या भेकुटिया भागात उदय दुबे हे घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

ठळक मुद्देभाजपा नेते शुभेंद्रू अधिकारी यांच्या समर्थनार्थ या परिसरात प्रचार करणारे सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांनी रोड शोमध्ये भाग घेतल्यानंतर दुबे यांना 30 मार्चपासून तृणमूल कॉंग्रेसकडून  धमक्या मिळत होत्या, असा आरोप भाजपा नेत्यांनी केला.

नंदीग्राम: पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राममध्ये गुरुवारी एका भाजपा कार्यकर्ता घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. हाय प्रोफाइल सीटसाठी सुरु असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी नंदीग्रामच्या भेकुटिया भागात उदय दुबे हे घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. भाजपा नेते शुभेंद्रू अधिकारी यांच्या समर्थनार्थ या परिसरात प्रचार करणारे सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांनी रोड शोमध्ये भाग घेतल्यानंतर दुबे यांना 30 मार्चपासून तृणमूल कॉंग्रेसकडून  धमक्या मिळत होत्या, असा आरोप भाजपा नेत्यांनी केला.टीएमसीच्या गुंडांनी त्याची गळफास लावून हत्या केली असावी असा आरोप त्यांनी केला. टीएमसीने हे आरोप फेटाळून लावत मृत्यूवरुन राजकारण केल्याबद्दल भाजपावर निशाणा साधला. टीएमसीच्या एका वरिष्ठ नेत्याने असा दावा केला आहे की, "कौटुंबिक समस्येमुळे दुबे यांनी आत्महत्या केली."पोलिसांनी सांगितले की, अपमृत्यूचा मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण कळू शकेल. पोलीस पुढे म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी केंद्रीय सैन्याने तैनात केली आहे. नंदीग्राममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे माजी सहयोगी आणि भाजपाचे उमेदवार शुभेंद्रू अधिकारी यांच्यात राजकीय स्पर्धा आहे, त्यानुसार येथे कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीPoliceपोलिसBJPभाजपाtmcठाणे महापालिका