कल्याणात राजकीय चर्चेतून वाद झाला; एकाने फोडले दुसऱ्याचे डोके

By मुरलीधर भवार | Published: September 9, 2022 03:40 PM2022-09-09T15:40:45+5:302022-09-09T15:41:43+5:30

आज ठिकठिकाणी राज्यातील किंवा देशातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडीवर चर्चा सुरु असते. चर्चे दरम्यान तर्क विर्तक लावले जातात.

Political discussions in Kalyan led to controversy; One shop worker smashed the other's head | कल्याणात राजकीय चर्चेतून वाद झाला; एकाने फोडले दुसऱ्याचे डोके

कल्याणात राजकीय चर्चेतून वाद झाला; एकाने फोडले दुसऱ्याचे डोके

Next

कल्याण-भांडी विक्रीच्या दुकानात देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा सुरु होती. ही चर्चा इतक्या विकोपाला गेली की, एका दुकानातील कामगाराने दुस:या दुकानातील कामगाराला कुक्करचे छाकणच फेकून मारले. या घटनेत धीरज पांडे नावाचा  तरुण जखमी झाला आहे. हल्ला करणारा दुसरा तरुण मनिष गुप्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

आज ठिकठिकाणी राज्यातील किंवा देशातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडीवर चर्चा सुरु असते. चर्चे दरम्यान तर्क विर्तक लावले जातात. चर्चेतील एखादा मुद्दा पचनी पडला नाही तर  वाद विकोपाला जातो.  कल्याण पश्चिमेतील बाजार पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भांडी विक्रीच्या बाजारपेठेत एका दुकानात यू टय़ूब चॅनलवर दाखविल्या जाणा:या राजकीय विषयावर चर्चा सुरु होती. देशावर किती कर्ज आहे. बजेट काय मांडले आहे. नेमकी काय परिस्थिती आहे. ही चर्चा सुरु असताना धीरज पांडे नावाचा तरुण काही जणांसोबत चर्चा करीत होता.

या चर्चेत शेजारच्या दुकानातील कामगार मनिष गुप्ता हा देखील सहभागी झाला होता. धीरजने जो मुद्दा चर्चेच्या दरम्यान उपस्थित केला. तो मनिषला पटला नाही. मनिषने थेट कूक्करचे झाकण उचलून धीरजच्या डोक्यावर मारले. यात धीरज पांडे हे जखमी झाले. बाजारपेठ पोलिसांनी हल्ला करणा:या मनिष गुप्ताला ताब्यात घेतले आहे.जखमी तरुणाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी यासाठी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आशा रसाळ आणि राणी कपोते यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Political discussions in Kalyan led to controversy; One shop worker smashed the other's head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.