शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांशी हुज्जत घालणारे टिपले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 21:18 IST

वाहतूक पोलिसांना आता दिले जाणार कॅमरे 

पणजी - वाहतूक पोलिसांची हुज्जत घालण्याची सवय असलेल्यांसाठी वाईट खबर आहे. वाहतूक पोलिसांना आता कॅमरे दिले जाणार असल्यामुळे हुज्जत घालणारे आणि पोलीस यांच्यतील संवाद व्हिडिओसह रेकॉर्ड केला जाणार आहे. त्यामुळे पोलिसांना दुरुत्तरे देणाऱ्या गुन्हे दाखलही केले जाऊ शकतील. 

गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागासाठी कॅमरे खरेदी करण्यात आले आहेत. हे कॅमरे उत्तर व दक्षिण गोव्यातील वाहतूक विभागाला दिले जाणार आहेत. रस्त्यावर राहून वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना हे कॅमरे दिले जाणार आहेत. लोक व पोलीस यांच्यातील संवाद टीपणे व इतर कामासाठी त्याचा वापर केला जाणार आहे. केवळ एक स्वीच दाबून रेकॉर्डिंग सुरू करणे या कॅमऱ्यांमुळे शक्य होते. 

वाहतूकीवर नियंत्रण ठेवताना वाहतूक पोलिसांना ज्या समस्या उद्भवतात त्यात लोकांकडून हुज्जत घालण्याचे प्रकार अधिक आहेत. वाहतूक नियमाचा भंग केल्यामुळे ज्यावेळी एखाद्याला दंड केला जातो. त्यावेळी अशी हुज्जत घालणे, इतरांवर कारवाई का नाही माझ्यावरच का? अशा प्रकारचे उलट प्रश्न विचारणे व दुरुत्तरे देणे असे प्रकार घडत असल्याच्या वाहतूक पोलिसांच्या तक्रारी होत्या. अशा लोकांवर अंकूश ठेवण्यासाठी हे कॅमरे देण्यात आले आहेत अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली. कॅमऱ्यामधील रेकॉर्डिंगच्या आधारावर पोलीसनंतर सबंधित व्यक्तीवर गुन्हेही दाखल करू शकतात. तसेच या कॅमऱ्याचा आणखी एक फायदा म्हणजे पोलिसांचीही लोकांबरोबरची वागणूक या कॅमेऱ्यात टिपली जाणार असल्यामुळे पोलिसांवरही अंकूश राहणार आहे. वाहतूक पोलिसांना कॅमरे देण्याची पद्धत अनेक युरोपीय राष्ट्रात आहे. ते कॅमरे लहान असतात आणि खिशाला लावलेले असतात. समोरचा माणूस जेव्हा ऐकायच्या मनस्थितीत नसतो तेव्हा केवळ एक स्वी दाबल्यावर कॅमºयातून रेकॉर्डिंग सुरू होते. अशा प्रकारचा देशातील हा पहिलाच प्रयत्न आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस