शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अर्णब गोस्वामींना मोबाईल वापरायला देणे पडले महागात, पोलिसांना गमवावी लागली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 09:08 IST

Arnab Goswami News : अर्णब गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडी दरम्यान, मोबाईल वापरायला देणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच महाग पडले आहे.

मुंबई - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. दरम्यान अर्णब गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडी दरम्यान, मोबाईल वापरायला देणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच महाग पडले आहे. तुरुंगात कैद्यांना स्वत:चा मोबाईल वापरण्यास दिल्या प्रकरणी या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.अर्णब गोस्वामी यांना अटक करून अलिबाग येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर गोस्वामी यांना न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयीन कोठडीसाठी अर्णब गोस्वामी यांची रवानगी अलिबाग येथील शाळेत तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या तुरुंगात करण्यात आली होती. मात्र तिथे असताना अर्णब गोस्वामी हे मोबाईल वापरत असल्याचे तसेच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असल्याचे दिसून आले होते.त्यानंतर या प्रकाराची गंभीर दखल घेत कारागृह प्रशासनाने या प्रकाराची खातेनिहाय चौकशी सुरू केली होती. तसेच तुरुंगात असलेल्या इतर कैद्यांकडेही याबाबत चौकशी करण्यात आली होती. त्यामधून दोन पोलीस कर्मचारी हे पैसे घेऊन कैद्यांना स्वत:चा मोबाईल वापरण्यास देतात, अशी माहिती समोर आली. त्यानंतर या प्रकरणी सुभेदार अनंत भेरे आणि पोलीस शिपाई सचिन वाडे यांना निलंबित करण्यात आले आहे.दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामी यांना ४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील घरातून अटक करण्यात आली होती.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस