शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

संजेश पातकरांवरील गोळीबारामागचे कारण शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 18:32 IST

या गोळीबाराचा प्रकार पाहता पातकर यांना घाबरविण्यासाठी हा गोळीबार केल्याचे बोलले जात आहे. 

ठळक मुद्देप्रसिध्द बांधकाम व्यवसायिक संजेश पातकर यांच्यावर बुधवारी सयांकाळी झालेल्या गोळीबारात ते थोडक्यात बचावले आहे. याआधी पातकर यांना काही वर्षापूर्वी खंडणीसाठी धमकाविण्यात आले होते.

 

बदलापूर - बदलापूरातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक संजेश पातकर यांच्यावर बुधवारी सयांकाळी झालेल्या गोळीबारात ते थोडक्यात बचावले आहे. मात्र, हा गोळीबार नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला हे पातकर यांनाही अजून स्पष्ट झालेले नाही. तर दुसरीकडे पोलीस प्रशासन या गोळीबारामागे खंडणीशी संबंध आहे का याची चाचपणी करित आहे. या गोळीबाराचा प्रकार पाहता पातकर यांना घाबरविण्यासाठी हा गोळीबार केल्याचे बोलले जात आहे. बदलापूर - कर्जत रोडवरी संजेश पातकर यांच्या कार्यालयाबाहेर ते आपल्या एका सहकाऱ्यासोबत चर्चा करित होते. त्यावेळेस दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पातकर यांच्या खाडीच्या बाजुला दुचाकी उभी करुन खाली उतरले. आणि त्यांनी पातकर यांच्या दिशेने दोन गोळ्या घाडुन पळ काढला. पहिली गोळी चालल्यावर लागलीच पातकर आणि त्यांचे सहकारी मित्र ह सतर्क होऊन पळाले. त्यामुळे त्यांच्या या गोळीबारातून बचाव झाला. या प्रकारानंतर पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता एक गोळी ही कार्यालयाच्या काचेवर खालच्या दिशेला मारली होती. त्यावरुन पातकर यांना घाबरविण्यासाठी हा प्रकार घडविण्यात आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, याआधी पातकर यांना काही वर्षापूर्वी खंडणीसाठी धमकाविण्यात आले होते. त्या प्रकरणाची याक संबंध आहे की नाही याची चाचपणी पोलीस करित आहेत. तर दुसरीकडे व्यावसायिक वादातून प्रकार घडला आहे का याचा तपास पोलीस करित आहेत. दरम्यान, बदलापूरात गोळीबाराचे प्रकार हे सातत्याने वाढत आहेत. त्यातच बदलापूरातील गुन्हेगारांकडे सर्रास बेकायदेशिररित्या बंदुका ठेवण्याचे प्रकार वाढल्याने या गुन्हेगारी वृत्तीचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का याचाही पोलीस करित आहेत. 

टॅग्स :FiringगोळीबारbadlapurबदलापूरPoliceपोलिस