कोल्हापूर - टीईटी आणि सेट परीक्षेचे पेपर फोडल्याप्रकरणी अटकेत असलेल्या गायकवाड टोळीचा अधिक तपास आणि प्रश्नपत्रिका पुरवणारा रितेशकुमारच्या शोधासाठी पोलिसांची पथके कराड व पुण्यात पोहोचली आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा प्रक्रियेची माहिती घेतली जाणार आहे. तसेच पेपरफुटीतील लाभार्थी शिक्षकांचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी दिली.
टीईटी आणि सेटचे पेपर फोडून लाखो रुपयांची कमाई केलेल्या गायकवाड टोळीच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. त्यांना बिहारमधील रितेशकुमार या व्यक्तीने २०२३ पासून काही परीक्षांचे पेपर पुरवल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. अटकेतील संदीप आणि महेश गायकवाड या बंधूंची जय हनुमान करिअर अकॅडमी बेलवाडी (ता. कराड) येथे आहे. या अकॅडमीतून गेल्या चार वर्षांत विविध खात्यांमध्ये नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेतली जाणार आहे.
दोन कार, १९ मोबाइल जप्तएजंट राहुल पाटील याच्याकडील फॉर्च्युनर कार आणि सूत्रधार महेश गायकवाड याची व्हेन्यू कार पोलिसांनी जप्त केली. तसेच १९ मोबाइल, दोन प्रिंटर, असा सुमारे २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
परीक्षा परिषदेकडून माहिती देण्यास टाळाटाळतपास अधिकारी क्षीरसागर यांनी परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना फोन करून परीक्षेच्या नियोजनाबद्दल माहिती मागितली. मात्र, गोपनीय माहिती देता येणार नसल्याचे सांगत त्यांनी सुरुवातीला सहकार्य करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर नोटीस घेऊनच पोलिस अधिकारी परीक्षा परिषदेच्या पुण्यातील कार्यालयात पोहोचले.
१८४ नावांची यादीटीईटीचा पेपर मिळविण्यासाठी १८४ परीक्षार्थ्यांनी १६ एजंटशी संपर्क साधला होता. या सर्वांची यादी पोलिसांकडे आहे. यातील किती जणांनी प्रत्यक्षात शैक्षणिक कागदपत्रे आणि धनादेश एजंटकडे दिले, याची पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिक्षण खात्याशी पोलिसांचा पत्रव्यवहारअटकेतील शिक्षक रोहित सावंत, अभिजित पाटील आणि किरण बरकाळे यांच्या नियुक्तीची माहिती मागवण्यासाठी पोलिसांनी उच्च माध्यमिक शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच प्राचार्य गुरुनाथ चौगले याच्या चौकशीसाठी शिवाजी विद्यापीठ, शिक्षण सहसंचालक कार्यालय आणि सोळांकुर येथील शिक्षण संस्थेशी पत्रव्यवहार केला आहे.
Web Summary : Police investigating the TET and SET paper leak are in Karad and Pune, seeking Riteshkumar, the alleged supplier. The investigation expands, revealing a network of agents and beneficiaries. Authorities have seized cars, mobile phones and are questioning education officials. 184 candidates are under scrutiny.
Web Summary : टीईटी और सेट पेपर लीक की जांच कर रही पुलिस कराड और पुणे में, कथित आपूर्तिकर्ता रितेशकुमार की तलाश कर रही है। जांच का दायरा बढ़ रहा है, एजेंटों और लाभार्थियों का नेटवर्क सामने आ रहा है। अधिकारियों ने कारें, मोबाइल फोन जब्त किए और शिक्षा अधिकारियों से पूछताछ कर रहे हैं। 184 उम्मीदवार जांच के दायरे में हैं।