शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

धूम स्टाईल लुटणारी टोळी केली पोलिसांनी अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 21:27 IST

गुन्हे शाखेच्या कक्ष - ४ ने अटक केली

मुंबई - मध्यरात्रीच्या वेळी एकट्याने जाणाऱ्या वाटसरूंना मोटारसायकलवरून येऊन हेरून जबरदस्तीने लुटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या कक्ष - ४ ने अटक केली आहे. सुमंत उर्फ बंटी संजय शिंदे (वय - १८), सचिन विजय भालेराव (वय - १९) आणि अजय गौतम इंगळे (वय - २०) या तीन आरोपींना पोलिसांनी दादर टी. टी. येथील अटक केली आहे. 

एकट्या - दुकट्या पायी जाणाऱ्या प्रवासशांना लुटणाऱ्या टोळीबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार काल मध्यरात्रीच्या वेळी सलग काही दिवस दादर व माटुंगा येथील रस्त्यावर  पळत ठेवून आज मध्यरात्रीच्या वेळी दादर टी. टी. येथील बाहेर गावी जाणाऱ्या, येणाऱ्या बसेस थांबण्याच्या मार्गावर एक यामाहा एफ झेड मोटार सायकलवरून तीन तरुण संशयास्पदरित्या घिरट्या घालत असल्याचे आढळून आले. दरम्यान पोलिसांनी या तीन तरुणांना दादर टी. टी. येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर अडवून ताब्यात घेतले. या तरुणांकडे ड्राईव्हिंग लायसन्स नसून त्यांना त्याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले असता अधिक चौकशीअंती  त्यांच्याविरोधात सायन, दादर, कुर्ला रेल्वे टर्मिनस, पंतनगर, नेहरूनगर आदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईPoliceपोलिसRobberyदरोडाArrestअटक