शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शॉपिंग बिलाच्या मदतीने प्रेयसीच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचले पोलीस, 'हे' होतं हत्येमागचं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 18:22 IST

नंदुरबार पोलिसांसाठी ही एक ब्लाइंड मर्डर केस होती. कारण घटनास्थळाहून पोलिसांना काहीच पुरावा हाती लागला नव्हता.

असं म्हणतात की, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो गुन्हा केल्यावर काहीना काही पुरावा नक्कीच सोडून जातो. अशीच एक घटना नंदुरबारमधून समोर आली आहे. इथे एका गुन्हेगाराने एका तरूणीची फारच सफाईने हत्या केली होती. मात्र, स्थानिक पोलीस आणि गुजरात सूरत पोलिसांच्या संयुक्त ऑपरेशनने तरूणीच्या मारेकऱ्याला पकडलं आहे. नंदुरबारमध्ये २६ ऑगस्ट २०२१ बिलाडी भागात २० ते २५ वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आला होता. खबर मिळताच नंदुरबार पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मारेकऱ्याने तिच्या चेहऱ्यावर अनेक वार केले होते. 

नंदुरबार पोलिसांसाठी ही एक ब्लाइंड मर्डर केस होती. कारण घटनास्थळाहून पोलिसांना काहीच पुरावा हाती लागला नव्हता. नंदुरबार पोलिसांनी केस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न सुरू केला तर त्यांना सर्वातआधी पाचोराबारी भागात एक सीसीटीव्ही फुटेज मिळालं. त्यात मृत तरूणीच्या कपड्यांसारखे कपडे घातलेली एक तरूणी दिसत होती. त्यावेळी तिच्यासोबत एक तरूणही होता.

इथूनच नंदुरबार पोलिसांना मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिली पायरी मिळाली होती. पण केवळ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर ते शक्य नव्हतं. नंतर पोलिसांनी ढेकवत रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. पण सूरत-भुसावळ रेल्वे एक मिनिटासाठी थांबली होती. 

इथे एका ऑटोतून उतरताना एक तरूण-तरूणी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. नंदुरबार पोलिसांनी एकूण २१ रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले होते. ज्यातून समोर आलं की, हे दोघेही सूरत रेल्वे स्टेशनहून चढले होते. नंदुरबार एसपी महेंद्र पंडित यांनी सांगितलं की, सूरतच्या अल्ट्रालाइफ स्टाइल शॉपिंग मॉलमध्ये मृत महिला आणि पकडण्यात आलेला आरोपी शॉपिंग करताना दिसले होते. त्या शॉपिंगग मॉलमध्ये सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्या आधारावर शॉपिंगचं बिल सापडलं. ज्यावर आरोपीचं नाव आणि मोबाइल नंबर होता. त्याआधारावर सूरत क्राइम ब्रांचच्या मदतीने नंदुरबार लोक क्राइम ब्रांचने आरोपी विनय कुमार रायला अटक केली. 

प्रेयसीपासून लपवली विवाहित असल्याची बाब

नंदुरबारचे एसपी महेंद्र पंडित यांनी सांगितलं मृत तरूणीचे आरोपी तरूणासोबत प्रेमसंबंध होते. पण आरोपी विवाहित आहे. ही बाब त्याने मृतक प्रेयसीपासून लपवली होती. यामुळे दोघांमध्ये भांडण झालं आणि प्रकरण हत्येपर्यंत पोहोचलं.

महाराष्ट्र नंदुरबारमध्ये झालेल्या एका तरूणीच्या हत्येची केस नंदुरबार आणि सूरत पोलिसांनी मिळून सॉल्व्ह केली. पण मर्डरच्या आरोपीचं सरनेम वेगवेगळं सांगितलं. सूरत पोलिसांनी विनय यादव सांगितलं तर नंदुरबार पोलिसांनी विनय राय सांगितलं. इतकंच नाही तर मर्डर करण्याचं कारणही दोन्ही पोलिसांनी वेगवेगळं सांगितलं. सध्या आरोपी विनय रायला सूरत पोलिसांना अटक करून नंदुरबार पोलिसांकडे सोपवलं आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी