शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

बंदुकीचा धाक दाखवून पोलिसाने केला बलात्कार, महिलेने केला खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 13:40 IST

Rape Case : पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेने २०१९ मध्ये दुसर्‍या पुरुषाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती, ज्याने आपली ओळख खोटी करून तिचे अपहरण केल्याचा दावा तिने केला होता. पोलिसांनी या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते.

लखनऊ - गेल्या दोन वर्षांपासून आरोपीने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे आणि ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार एका २८ वर्षीय महिलेने केल्यानंतर मुरादाबादमध्ये ३१ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने एका स्थानिक तरुणाविरुद्ध अपहरण आणि बलात्काराच्या तक्रारीच्या संदर्भात चौकशी करण्याच्या बहाण्याने दोन वर्षांपूर्वी जेव्हा तो तिच्या घरी गेला तेव्हा कॉन्स्टेबलने प्रथम बंदुकीच्या धाकावर तिच्यावर बलात्कार केला.पोलिसांनी सांगितले की, महिलेने पोलीस कॉन्स्टेबलने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्याने तिने त्यावेळी तक्रार दाखल केली नाही असा दावा केला आहे. गेल्या दोन वर्षांत त्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. “गेल्या आठवड्यात पीडितेला समजले की, आरोपी विवाहित आहे आणि त्याला पाच वर्षांचा मुलगा आहे. पीडितेचा दावा आहे की, जेव्हा तिने कॉन्स्टेबलला याबाबत विचारले तेव्हा त्याने तिला या प्रकरणाबद्दल कोणाशीही बोलू नये अशी धमकी दिली,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.महिलेने तिची तक्रार घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि शनिवारी बलात्कार आणि धमकीच्या आरोपाखाली कॉन्स्टेबलविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. “आम्ही उद्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पीडितेचे जबाब नोंदवू. पुरावे तपासल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ. आरोपी हवालदाराची नुकतीच मुरादाबादहून बलिया येथे बदली करण्यात आली आहे,” असे पोलीस अधिकारी म्हणाले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेने २०१९ मध्ये दुसर्‍या पुरुषाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती, ज्याने आपली ओळख खोटी करून तिचे अपहरण केल्याचा दावा तिने केला होता. पोलिसांनी या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते.महिलेच्या म्हणण्यानुसार, तक्रार दाखल केल्यानंतर काही दिवसांनी आरोपी कॉन्स्टेबलने तिच्याशी संपर्क साधला होता. त्याने कथितरित्या तिचा मोबाईल क्रमांक घेतला आणि प्रकरणाची माहिती गोळा करण्याच्या बहाण्याने तिला अनेकदा फोन करून घरी भेटण्यास येत असे. पीडितेचा दावा आहे की, डिसेंबर २०१९ मध्ये ती एकटी असताना हवालदार तिच्या घरी आला. आपल्याजवळ असलेल्या देशी बनावटीच्या पिस्तुलाची धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. तो पीडितेच्या घरी एक रात्र राहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले,” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसKidnappingअपहरण