शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

हॉटेलमधील सेक्स रॅकेटवर पोलिसांचा छापा; तीन कॉलेज तरुणींसह 12 महिलांची सुटका, नोएडातील कुटुंबीयही हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 09:04 IST

Sex Racket Exposed in Noida: तरुणींना नोएडाच्या वन स्टॉप सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. पुरुषांची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली जात होती. या गोरखधंद्याल पाठीशी घालणाऱ्या सहा पोलिसांवर देखील कारवाई करण्यात आली आहे.

नोएडा : ग्रेटर नोएडाच्या चीती गावामध्ये एका आलिशान हॉटेलवर शनिवारी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. येथे नोएडा, बुलंदशहर आणि आजुबाजुच्या भागातून लोक मौजमजा करण्यासाठी येत होते. पोलिसांनी छापा टाकून 12 तरुणी आणि 11 पुरुषांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणींमध्ये तीन ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थिनी आहेत. (Sex Racket exposed in Noida.)

यावेळी पोलिसांनी हॉटेच्या मालकासह मॅनेजरला अटक केली आहे. तसेच आपत्तीजनक वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. शहरापासून दूर असलेल्या या हॉटेलमध्ये हा गोरखधंदा सुरु होता. एसीपी बृजनंदन राय यांनी अटक झालेल्या आरोपींविरोधात सेक्स रॅकेटची गुन्हे दाखल केले आहेत. सोबतच सर्वांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. 

तरुणींना नोएडाच्या वन स्टॉप सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. पुरुषांची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली जात होती. या गोरखधंद्याल पाठीशी घालणाऱ्या सहा पोलिसांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. एसीपी ब्रजनंदन राय यांच्या म्हणण्यानुसार दनकौर-सिकंदराबाद रोडवरील न्यू क्राउन प्लाझा हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. हे हॉटेल 2014 पासून सुरु होते. या हॉटेलमध्ये चीती गावचा रहिवासी ज्ञानेंद्र मॅनेजर होता. शनिवारी दुपारी या हॉटेलवर छापा टाकला. पोलिसांनी मॅनेजरला ताब्यात घेऊन सर्व खोल्या उघडायला लावल्या. तसेच या खोल्यांमध्ये असलेल्या महिला आणि पुरुषांना ताब्यात घेण्यात आले. काही महिला पोलिसांना पाहून पळून जाऊ लागल्या, त्यांना महिला कॉन्स्टेबलच्या मदतीने अटक करण्यात आली. 

या सेक्स रॅकेटमध्ये नोएडासह दनकौर गावातील काही तरुणी यात सापडल्या आहेत. याची माहिती जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना कळली तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. त्या साऱ्या कामाचे निमित्त करून घरातून सकाळी निघत होत्या. मात्र, आपल्याला त्या असे काही करतील याची कल्पना नव्हती असे या तरुणींच्या पालकांनी पोलिसांना सांगितले. 

पोलिसांनी सांगितले की, हॉटेल सुरु होते खरे परंतू तिथे जेवणाचे काहीच बनवत नव्हते. गेल्या काही महिन्यांपासून हा धंदा सुरु होता. पोलिसांना मिळालेल्या सुचनेच्या आधारे मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस