शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा; समोर आलं छत्तीसगड कनेक्शन, दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 23:08 IST

कुख्यात शाहूचे क्रिकेट सट्ट्यात मोठे नाव आहे. त्याचे नागपुरातील बंटी ज्यूस, शैलू पान, पंकज कडी-समोसा यासारख्या बड्या बुकींसोबतही संबंध आहेत.

नागपूर- छत्तीसगडच्या बुकीचे कनेक्शन (आयडी) घेऊन क्रिकेट सामन्याची सट्टेबाजी (Cricket Betting) करणाऱ्या दोन बुकींना गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली. अमजद खान नवाब खान पठाण (रा. भालदारपुरा) तसेच इरफान रियाज खान (वय ३२, रा. गांधी पुतळ्याजवळ, इतवारी), अशी त्यांची नावे आहेत.

भालदारपुऱ्यातील एका दर्ग्याजवळ राहणारा अमजदखान हा त्याच्या साथीदारासह स्वत:च्या घरात क्रिकेट सट्ट्याची खायवाडी करीत असल्याचे गुन्हे शाखेच्या पथकाला समजले. त्यावरून पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय माधुरी नेरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह खानच्या अड्ड्यावर बुधवारी रात्री ८.४५ वाजता छापा घातला. यावेळी अमजद खान तसेच इरफान खान दुबईत सुरू असलेल्या न्यूझिलंड विरुद्ध इंग्लंड दरम्यानच्या टी-२० क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी करताना आढळले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून टीव्ही, लॅपटॉप, विविध कंपनीचे मोबाईल तसेच रोख सहा हजार, असा एकूण एक लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी अमजद तसेच रियाजला गणेशपेठ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

छत्तीसगडमधील कुख्यात शाहूचे नागपुरातही नेटवर्क -बुकी अमजद आणि रियाज खान हे दोघे राजनांदगाव(छत्तीसगड)मधील कुख्यात बुकी अमरित शाहू याच्याकडे सट्ट्याची उतारी (कटिंग) करीत असल्याचे आणि त्यानेच दिलेल्या आयडीवर हे दोघे सट्टेबाजी करीत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. त्यामुळे या गुन्ह्यात पोलिसांनी त्यालाही आरोपी बनविले आहे. कुख्यात शाहूचे क्रिकेट सट्ट्यात मोठे नाव आहे. त्याचे नागपुरातील बंटी ज्यूस, शैलू पान, पंकज कडी-समोसा यासारख्या बड्या बुकींसोबतही संबंध आहेत. ही मंडळी काही भ्रष्ट पोलिसांना तसेच सराईत गुंडांना हाताशी धरून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची सट्टेबाजी करतात. त्यातून त्यांनी अनेक बड्या घरच्या तरुणांची मालमत्ताही हडपलेली आहे. लोकमतने क्रिकेट सट्टेबाजांबाबतचे वृत्त वेळोवेळी प्रकाशित केले आहे.

टॅग्स :Satta Bazarसट्टा बाजारnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगड