शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

लोदगा शिवारातील कला केंद्रावर पोलिसांची धाड; चौघांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 20:45 IST

लातूर - शहरापासून जवळच असलेल्या लातूर-निटूर मार्गावरील लोदगा शिवारातील एका कला केंद्रावर पोलीस पथकाने बुधवारी पहाटे छापा मारला. यावेळी रोख रकमेसह चौघांना ताब्यात घेतले असून, औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर-निटूर या मार्गावरील लोदगा शिवारात असलेल्या एका कलाकेंद्रावर अनैतिक प्रकार सुुरु असल्याची माहिती खबऱ्यामार्फत लातूर ग्रामीणच्या ...

लातूर - शहरापासून जवळच असलेल्या लातूर-निटूर मार्गावरील लोदगा शिवारातील एका कला केंद्रावर पोलीस पथकाने बुधवारी पहाटे छापा मारला. यावेळी रोख रकमेसह चौघांना ताब्यात घेतले असून, औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर-निटूर या मार्गावरील लोदगा शिवारात असलेल्या एका कलाकेंद्रावर अनैतिक प्रकार सुुरु असल्याची माहिती खबऱ्यामार्फत लातूर ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने बुधवारी पहाटे ५ वाजता छापा मारला. यावेळी कला केंद्रावरील तीन मुलींसह चौघा पुरुषांना ताब्यात घेतले आहे. यावेळी रोख २० हजार ६९३ रुपये, दारुच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत किरण शरद जाधव, अमोल स्वरुप उजंबे (दोघेही रा. लोदगा ता. औसा), दगडू ज्ञानोबा खैरमोडे (रा.  साळे गल्ली लातूर), बालाजी सूर्यकांत जाधव (रा. पानचिंचोली ता. निलंगा) यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लातूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस