शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने केला बलात्कार, अश्लिल व्हिडीओ दाखवून केले ब्लॅकमेल, नॅशनल अ‍ॅथलिटचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 12:20 IST

Crime News: एका पोलिस अधिकाऱ्याने सरकारी नोकरीचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा तसेच अश्लिल व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप राष्ट्रीय पातळीवरच्या एका महिला अ‍ॅथलिटने केला आहे. 

लुधियाना - पंजाबमधील लुधियाना येथून बलात्काराची एक धक्कादायक घटना घडली आहे. (Crime News)येथील एका पोलिस अधिकाऱ्याने सरकारी नोकरीचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा तसेच अश्लिल व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप राष्ट्रीय पातळीवरच्या एका महिला अ‍ॅथलिटने केला आहे. (Police officer raped by showing job lure, blackmailed by showing pornographic videos, serious allegations of national athlete)

 पोलिस अधिकाऱ्यावर झालेल्या या आरोपांमुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. पीडित महिला राष्ट्रीय वेटलिफ्टर असून, तिने पोलीस कमिश्नरांकडे दाद मागितली आहे. वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेने सांगितले की, पोलीस अधिकाऱ्याने तिला स्पोर्ट्स कोट्यामधून सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर नोकरीसंबंधी बोलण्याच्या बहाण्याने तो तिला वारंवार हॉटेलमध्ये बोलावत असे. तसेच तिच्यावर बलात्कार करत असे. 

एवढेच नाही तर पीडितेने सांगितले की, पोलीस अधिकाऱ्याने तिचा एक अश्लिल व्हिडीओसुद्धा बनवला होता. तो व्हिडीओ दाखवून हा अधिकारी तिला ब्लॅकमेल करत असे. तसेच वारंवार बलात्कार करत असे.  आता पोलीस कमिश्नरांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच एखा महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पोलिसांवर झालेल्या गंभीर आरोपांबाबत एडीसीपी प्रज्ञा जैन यांनी सांगितले की, आता हे प्रकरण समोर आले आहे. मात्र आतापर्यंत आरोपांना दुजोरा मिळू शकलेला नाही. या हिला खेळाडूने केलेल्या आरोपांचा आधी तपास केला जाईल. तसेच ते खरे असल्याचे सिद्ध झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPunjabपंजाब