शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

'ढिश्शक्याव ढिश्शक्याव' आवाज करून गुंडाला पळवणारा  'तो' पोलीस अधिकारी चकमकीत जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 19:17 IST

तोंडानेच 'ढिश्शक्याव ढिश्शक्याव' आवाज करून गुंडांना पळवून लावल्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेले उत्तर प्रदेश पोलीस खात्यातील अधिकार चकमकीत जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देतोंडानेच 'ढिश्शक्याव ढिश्शक्याव' आवाज करून गुंडांना पळवून लावणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी बराच व्हायरल झाला होतासंभल येथील पोलीस सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असलेले मनोज कुमार हे शुक्रवारी झालेल्या एका चकमकीत जखमी झाले आहेत

लखनौ - तोंडानेच 'ढिश्शक्याव ढिश्शक्याव' आवाज करून गुंडांना पळवून लावणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी बराच व्हायरल झाला होता.  मनोज कुमार असे नाव असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याने बंदूक जाम झाल्यानंतर  दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुकही झाले होते. दरम्यान संभल येथील पोलीस सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असलेले मनोज कुमार हे शुक्रवारी झालेल्या एका चकमकीत जखमी झाले आहेत. या चकमकीनंतर पोलिसांनी अलियानेकपूर येथून सद्दाम या कुख्यात गुंडाला अटक केली आहे. सद्दाम हा लूट, चोरी आणि हत्येचा प्रयत्न अशा 15 गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता. सद्दाम हा आपला सहकारी अक्रम याच्यासोबत असमोली येथे जात असताना सद्दामला पोलिसांनी हटकले. त्यावेळी सद्दाम आणि त्याच्या सहकाऱ्याने गोळीबार सुरू केला. या गोळीबारात मनोज यांच्या हाताला गोळी लागून ते जखमी झाले. पोलिसांनी प्रत्युत्तरदाखल केलेल्या कारवाईत सद्दामच्या पायात गोळी लागली. तर अक्रम फरार झाला.  सद्दाम याच्याकडून पोलिसांनी देशी कट्टा, काडतूस आणि एक चोरलेला मोबाइल जप्त केला आहे. तसेच त्याच्याविरोधात भादंवि कलम 307, 411 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काही महिन्यांपूर्वी संभल येथे एका शेतात लपून बसलेल्या गुंडांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी, अचानक पोलीस अधिकाऱ्याजवळ असलेली बंदुक बिघडली. ही बंदुक जाम झाल्याने त्यातून गोळी फायर होत नव्हती. त्यामुळे या बंद पडलेल्या बंदुकीचा आधार घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्याने ढिश्शक्याव ढिश्शक्याव.. असा आवाज करत या गुंडांना पाठलाग केला होता. शुक्रवार 12 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओही समोर आला होता. नेटीझन्सकडून सोशल साईटवर शेअर केला जात होता.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस