शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

9 कोटींच्या बिटकॉइन्ससाठी पोलिस अधिकारी बनला गुन्हेगार, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 12:29 IST

जयपूरच्या एका व्यक्तीकडे 9 कोटी रुपयांचे 30 बिटकॉइन होते, पोलिस अधिकाऱ्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने त्या व्यक्तीचे अपहरण करुन त्याच्याकडील 30 बिटकॉइन घेतले.

नवी दिल्ली: सध्या बिटकॉइन या आभासी चलनाची सर्वत्र चर्चा आहे. या बिटकॉइनच्या गुंतवणुकीतून लोक लाखो-करोडो रुपये कमवत आहेत. दरम्यान, याच बिटकॉइनसाठी एक पोलिस अधिकारी गुन्हेगार झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील एका पोलिस उपनिरीक्षकाने 9 कोटी रुपयांच्या बिटकॉइनसाठी एका व्यक्तीचे अपहरण केले.

सविस्तर माहिती अशी की, जयपूरच्या एका व्यक्तीकडे 9 कोटी रुपयांचे 30 बिटकॉइन होते. सोनपतचा सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) शिव कुमारला ही गोष्ट कळाली. त्याने पोलिस कर्मचारी मोनू आणि तीन साथीदारांच्या मदतीने त्या व्यक्तीचे जयपूरमधून अपहरण केले आणि त्या धमकावून त्याच्याकडील 30 बिटकॉइन त्याच्या मोबाइलवरुन दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले. आता या प्रकरणी सिरसा पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. 

पीडित व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हाराजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील रहिवासी शशिकांतच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून पुढील तपासासाठी पोलिसांना जयपूरला पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शशिकांत हा स्वतः फरारी गुन्हेगार आहे. त्याच्यावर 2013 मध्ये सिरसा येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्याला अटकही करण्यात आली होती.

असे केले अपहरणशशिकांतने सांगितले आहे की, तो डिजिटल क्रिप्टोकरन्सीची कामे करतो. त्याची एएसआय कुमार आणि मोनू यांच्याशी आधीची ओळख आहे. त्याने सांगितले की, 22 जानेवारीला तो जयपूरमध्ये त्याचा मित्र गौरवच्या फ्लॅटवर असताना दोन पोलीस काळ्या रंगाच्या एसयूव्ही कारमध्ये त्यांच्या साथीदारांसह आले. त्यानंतर त्यांनी आम्हा दोघांचे अपहरण करुन खरखोडा पोलिस ठाण्यात नेले. मात्र तेथील पोलिसांनी त्याला बेकायदेशीर कोठडीत ठेवता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आम्हाला एका फार्महाऊसमध्ये ओलीस ठेवले आणि बिटकॉइन घेतले. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBitcoinबिटकॉइन