शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 3:13 PM

गुंड विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिसांच्या २५ टीम तयार करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देचकमकीत जखमी झालेल्या ७ पोलिसांवर कानपूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आता कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत कुमार यांनी बक्षिसाची रक्कम २. ५० लाख इतकी वाढवली आहे.  

कानपूर चकमकीत ८ पोलिसांची हत्या झाल्यानंतर संशयाच्या फेऱ्यात अडकलेले चौबेपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख विनय तिवारी यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, गुंड विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिसांच्या २५ टीम तयार करण्यात आल्या आहेत. विकासबाबत माहिती देणाऱ्यास आयजींनी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, चकमकीत जखमी झालेल्या ७ पोलिसांवर कानपूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. लखनौ पोलिसांनी विकास दुबे याच्या कृष्णानगरस्थित घरावर छापा मारला. मात्र, तो तिथे सापडला नाही. त्यानंतर आता कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत कुमार यांनी बक्षिसाची रक्कम २. ५० लाख इतकी वाढवली आहे.  

विकास दुबेची माहिती देणाऱ्याला याआधी ५० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार होते. त्यात वाढ करून एक लाख रुपये करण्यात आली होती. आता त्यात आणखी वाढ करून बक्षिसाची रक्कम अडिच लाख रुपये करण्यात आली आहे. कानपूरचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की, तिवारी यांच्यावरील आरोपांची चौकशी केली जात आहे. जर त्यांचा किंवा कोणत्याही पोलिसाचा या घटनेशी संबंध आढळून आला, तर त्याला केवळ बरखास्तच केले जाणार नाही, तर तुरुंगात पाठविले जाईल.पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, काही पोलिसांचीही चौकशी केली जात आहे. याचा शोध घेतला जात आहे की, पोलीस त्याच्या घरी धाड टाकणार याची त्याला माहिती कशी मिळाली. त्यामुळे त्याने पूर्ण तयारीनिशी पोलीस दलावर हल्ला केला.

पोलिसांनी विकास दुबेचे घर का पाडले? याबाबत विचारणा केली असता अग्रवाल म्हणाले की, गावातील लोकांचे म्हणणे आहे की, दुबेने गुंडागर्दी करून लोकांच्या जमिनीवर कब्जा केला होता. लोकांकडून वसुली करून हे घर बनविले होते.अग्रवाल यांनी सांगितले की, विकासला पकडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टीम राज्याच्या विविध भागांत आणि अन्य राज्यांतही धाडी टाकत आहेत. जवळपास ५०० मोबाईल फोनची तपासणी केली जात असून, त्या माध्यमातून विकासबद्दल काही माहिती मिळते का, ते शोधले जात आहे.

 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस