शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

हातावर गोंदलेलं प्रेयसीचं नाव पोलिसांनी अचूक हेरलं; वेशांतर करून फिरणारा आरोपी उत्तर प्रदेशमधून जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 16:36 IST

Murder Case : श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

ठळक मुद्दे त्याच्या उजव्या हातावर मात्र 'सायली' हे नाव गोंदलेले  पोलिसांनी हेरले आणि खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अक्षय कुलथे याला अखेर जेरबंद केले.

अहमदनगर/ राहुरी - पोलीस मागावर आहेत हे समजताच नगर जिल्ह्यातून 'तो' प्रसार झाला आणि उत्तरप्रदेशमध्ये दाखल झाला. तेथे वेषांतर करून शेतमजूर म्हणून काम करू लागला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याचा ठावठिकाणा शोधला. मात्र तोंडाला मास्क आणि वेषांतरमुळे एकवेळ पोलिसांनाही तो ओळखू येईना. त्याच्या उजव्या हातावर मात्र 'सायली' हे नाव गोंदलेले  पोलिसांनी हेरले आणि खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अक्षय कुलथे याला अखेर जेरबंद केले.श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे 6 एप्रिल रोजी आरोपींनी अपहरण करून त्यांचा खून केला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी व तोफिक मुक्तार शेख यांना अटक केली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर मिटके यांच्या पथकाने या हत्याकांडातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे याला जेरबंद केले. या गुन्ह्यातील  चौथा आरोपी अक्षय कुलथे मात्र फरार होता. कुलथे हा उत्तरप्रदेशमधील चटिया (ता. बिनंदनकी  जि.फत्तेपूर) येथे असल्याची माहिती उपाधिक्षक मिटके यांना समजली होती. त्यानंतर पथकाने चटिया या खेडेगावात कुलथे याचा शोध घेतला. त्याच्या उजव्या हातात प्रेयसीचे नाव गोंदलेले आहे ही बाब पोलिसांना माहिती होती. हिच ओळख पटवून पोलिसांनी त्याला जेरबंद केले. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली 

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, उपनिरीक्षक शेळके,  निलेशकुमार वाघ,  नीरज बोकील,  मधुकर शिंदे,  राजेंद्रअरोळे, हेड कॉन्स्टेबल सुरेश  औटी, पोलीस नाईक फुरकान शेख, शिवाजी खरात,  रवींद्र मेढे, विकास गुंजाळ, सुनील शिंदे, नितीन शिरसाठ,  आजिनाथ पाखरे आदींनी पथकाने ही कारवाई केली.आरोपीची घेतली ट्रांजिट रिमांड कस्टडीअक्षय कुलथे याला उत्तरप्रदेश येथून पोलिसांनी अटक केल्यानंतर फत्तेपुर येथील जिल्हा न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. तेथे त्याची ट्रांजिट रिमांड  कस्टडी घेऊन त्याला नगर येथे आणण्यात आले. कुलथे याच्याविरोधात राहुरी, राहता व कोपरगाव पोलिस ठाण्यात विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :ArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेशAhmednagarअहमदनगरPoliceपोलिसJournalistपत्रकार