शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 23:58 IST

१०० कोटींचे एमडी ड्रग विक्री तर १०० कोटींचे एमडी व साहित्य जप्त

मीरारोड: मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांनी राजस्थानच्या झुनझुनु येथून कोंबडी पालनाच्या आड चालणारा एमडी या अमली पदार्थांचे उत्पादन करणारा कारखाना उद्ध्वस्त केला. पोलिसांनी एकूण ११ आरोपींना अटक केली असून त्यात दाऊद टोळीतील गुंडांचा सहभाग आहे. १०० कोटींचे एमडी व साहित्य जप्त केले असून या कारखान्यातून १०० कोटींच्या एमडीची पश्चिम भारतात विक्री झाल्याची माहिती पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

४ ऑक्टोबरला मीरारोड भागात अमली पदार्थ विरोधी कक्ष १ ने एमडी अर्थात मेफेड्रोन अमली पदार्थ विक्री प्रकरणी ६ जणांना अटक केली. १ कोटी ३२ हजारांचा अर्धाकिलो एमडी, १ ८६ हजारांचे ८ मोबाईल व ४ लाख १० हजार किमतीच्या ४ दुचाकी त्यांच्याकडून जप्त केल्या होत्या. अटक आरोपींच्या तपासातून आणखी ४ आरोपींना अटक करून २० लाख किमतीच्या २ कार, १ दुचाकी व २ लाखांचे ६ मोबाईल जप्त केले होते. गुन्ह्याचा तपास मीरा भाईंदर अमली पदार्थविरोधी शाखा १ आणि कक्ष २ चे पोलीस आणि सायबर पोलीस संयुक्तपणे करत होते.

गुन्ह्यातील अटक आरोपींची चौकशी व त्याची साखळी शोधत पोलिसांना राजस्थानच्या झुनझुनू मधून अमली पदार्थ विक्रीसाठी येत असल्याचा सुगावा लागला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक गेल्या आठवड्याभरा पासून झुनझुनु येथे तळ ठोकून होते. त्यांनी आपण ड्रॅग डीलर असल्याचे सांगून एमडी पुरवठादारच्या संपर्काच्या प्रतीक्षेत सापळा रचून होते. अखेर १४ डिसेंबरला एमडीचा साठा घेऊन विक्रीस आलेला हाती लागला व पोलिसांनी कोंबडी पालनच्या मोठ्या अवाढव्य शेड मधील बांधकामात चालत असलेला एमडी उत्पादनाचा कारखाना शोधून काढला.

सोमवारी पोलीस आयुक्तालयात पोलिसांनी पत्रकारांना माहिती दिली कि, झुनझुनु, राजस्थान येथे आरोपी अनिल विजयपाल सिहाग ह्याला अटक करून पोल्ट्रीफार्म मध्ये चालणारा एमडी ड्रग्स बनविण्याचा कारखाना उध्वस्त केला गेला. सुमारे १० किलो एमडी ड्रग्स, एमडी चे प्री-कर्सर रसायने तसेच एमडी ड्रग्स बनविण्याची आवश्यक फ्लास्क, मिक्सर, ड्रायर मशिन, वजन काटा, हँड ग्लोज, फिल्टर इ साधनसामुग्री असा एकुण रुपये १०० कोटी किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. गेल्या वर्षभरापासून हा कारखाना चालत असल्याचा व नुकतेच १०० कोटींचे अमली पदार्थ हे पश्चिम भारतात येथून पुरवले गेल्याचा संशय आयुक्तांनी वर्तवला. यातील अटक ११ पैकी ९ आरोपी हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले आहेत. ह्यातील काहीजण हे डी गँगशी संबंधित आहेत. हत्या, दहशतवादी कृत्य पासून विविध गुन्ह्यातील हे आरोपी आहेत. ह्यात आणखी तपास सुरु आहे असे आयुक्तांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Police bust drug factory disguised as poultry farm; 11 arrested.

Web Summary : Police in Mira Road dismantled a drug factory operating under the guise of a poultry farm in Rajasthan, arresting 11, including members of the Dawood gang. They seized MD drugs and materials worth ₹100 crore, suspecting distribution across western India.
टॅग्स :Drugsअमली पदार्थ