शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

पोलिसानेच पोलिसांकडून रात्रपाळीची ड्युटी न बदलण्यासाठी केली लाचेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 18:19 IST

Bribe Case : राजकुमार उत्तमराव चांदणे (५८)असे आरोपी फौजदाराचे नाव आहे.

ठळक मुद्देराखीव निरीक्षक यांची बदली झाल्यामुळे चांदणेकडे पोलीस निरीक्षकपदाचा पदभार होता. यातच त्याने कर्मचाऱ्यांकडुन वसूली सुरू केल्याची चर्चा सुरू होती.

औरंगाबाद: रात्रपाळीची ड्युटी न बदलण्यासाठी दोन हवालदारांना प्रतीमहा सहा हजार रुपये रुपये लाचेची मागणी करणाऱ्या शहर पोलीस मुख्यालयाच्या फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली. न्यायालयाने त्याची रवानगी हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत केली. राजकुमार उत्तमराव चांदणे (५८)असे आरोपी फौजदाराचे नाव आहे.

याविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार दोन हवालदार हे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. राखीव पोलीस उपनिरीक्षक म्हणून आरोपी चांदणे तेथे कार्यरत आहे. आरोपीने त्यांच्या ड्युटी रात्रपाळीवरुन दिवस पाळी अशी केली. तक्रारदार यांना रात्रपाळीची ड्युटी हवी असल्यामुळे त्यांनी राखीव उपनिरीक्षक चांदणे यांच्याकडे विनंती केली असता चांदणेने त्यांना मनासारखे काम हवे असेल तर प्रत्येकी तीन हजार यानुसार दोघांचे ६ हजार रुपये दरमहा देण्यास सांगितले. तक्रारदार हवालदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चांदणेची तक्रार केली. ८ डिसेंबर रोजीलाचलुचपत प्रतिबंधक चे उप अधीक्षक रुपचंद वाघमारे आणि कर्मचाऱ्यानी लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता आरोपीने लाच मागितल्याचे सिध्द झाले. एसीबीकडे आपली तक्रार झाल्याचा संशय फौजदार चांदणेला आल्याने त्याने लाचेची रक्कम घेतली नाही. दरम्यान तो रजेवर गेला होता. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आज याप्रकरणी आरोपीविरुध्द बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल केला. या नंतर एसीबीच्या पोलिसांनी आज दुपारी उपनिरीक्षक चांदणे याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चांदणे ची रवानगी हर्सुल कारागृहात केली. निवृत्तीला उरले होते अवघे काही दिवस आरोपी फौजदार चांदणे हा सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर होता. त्याने वयाची ५७ वर्ष काही महिने ओलांडली. राखीव निरीक्षक यांची बदली झाल्यामुळे चांदणेकडे पोलीस निरीक्षकपदाचा पदभार होता. यातच त्याने कर्मचाऱ्यांकडुन वसूली सुरू केल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान एसीबीला तक्रार प्राप्त झाल्यामुळे चांदणे आज पकडल्या गेला.

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसArrestअटक