Police defamed actress Raveena Tandon through fake profile | अभिनेत्री रवीना टंडनच्या बनावट प्रोफाइलद्वारे पोलिसांची बदनामी

अभिनेत्री रवीना टंडनच्या बनावट प्रोफाइलद्वारे पोलिसांची बदनामी

मुंबई :  बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन हिचे ट्विटरवर बनावट प्रोफाइल तयार करून त्याद्वारे मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही बाब रवीनाच्या लक्षात येताच तिने सायबर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार सायबर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर शुक्रवारी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला.
या बनावट ट्विटर हँडलवर मराठी भाषिकांचा अपमान करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांची आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी करणाऱ्या पोस्टही करण्यात आल्या असून परमबीर सिंह यांच्या छायाचित्रांची छेडछाड करून त्याचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. 
रवीनाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सायबर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. तसेच ट्विटरने हे बनावट हँडल बंद केले आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

Web Title: Police defamed actress Raveena Tandon through fake profile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.