पाेलीस हवालदाराने घेतली ३ हजार ५०० ची लाच, गडचिरोलीतील घटना
By दिगांबर जवादे | Updated: December 3, 2022 18:33 IST2022-12-03T18:33:20+5:302022-12-03T18:33:54+5:30
जामीन देण्यासाठी स्विकारली लाच

पाेलीस हवालदाराने घेतली ३ हजार ५०० ची लाच, गडचिरोलीतील घटना
गडचिराेली: तक्रारदाराच्या नातेवाईकाला अटक करून जेलमध्ये न पाठविण्यासाठी तसेच त्यास जामीन मिळवून देण्यासाठी ३ हजार ५०० रूपयांची लाच स्विकारणाऱ्या गडचिराेली पाेलीस स्टेशनच्या पाेलीस हवालदारास एसीबीच्या पथकाने अटक शनिवारी अटक केली. शकील बाबू सय्यद (५०) असे लाच घेणाऱ्या पाेलीस हवालदाराचे नाव आहे.
शकील याने पाेलीस स्टेशनमध्येच लाच स्विकारली. तक्रारदाराच्या तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने अगाेदरच सापळा रचला हाेता. लाचेची रक्कम स्विकारताच त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभाग गडचिराेलीचे पाेलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात पाेलीस निरिक्षक श्रीधर भाेसले, सहायक फाैजदार प्रमाेद ढाेरे, नाइक पाेलीस शिपाई राजू पद्मगीरवार, श्रीनिवास संगाेजी, पाेलीस शिपाई किशाेर ठाकूर, संदीप उडाण, संदीप घाेरमाेडे, विद्या म्हशाखेत्री, तुळशिराम नवघरे यांच्या पथकाने केली.