शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींसोबत बैठक करणारा पोलीस हवालदार निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 19:42 IST

Crime Case :बांधकाम व्यावसायिक राजेश कानबार खून प्रकरण

ठळक मुद्दे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी हा आदेश दिला आहे. परमेश्वर तुकाराम सोनके असे निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे.

पुणे : जमिनीच्या आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिक राजेश कानाबार यांच्यावर गोळीबार करुन त्यांचा खून केल्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार व इतरांबरोबर हॉटेलमध्ये बैठक घेणाऱ्या चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला निलंंबित करण्यात आले. पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी हा आदेश दिला आहे.परमेश्वर तुकाराम सोनके असे निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. ही घटना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एसबीआयच्या प्रवेशद्वाराजवळ ५ ऑक्टोंबर रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली होती. बावधन ब्रुद्रक येथील येथील जमिनीचा निकाल कानाबार यांच्या बाजूने लागणार असल्याचा अंदाज असल्याने आरोपींना हा गुन्हा केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.कानाबार यांच्या खुनासाठी राजेश शामलाल साळुंके (वय ३८, रा. सुखसागरनगर, कात्रज) याने मारेकर्याला पिस्तुल आणि काडतुसे पुरविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. तो व त्याचा साथीदार राकेश रमेश बुरटे (वय ३६, रा. जनता वसाहत, पर्वती) खुनाचे मुख्य सुत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यांच्यासह सनी अशोक वाघमारे (वय २६, रा. वाघोली), रोहित विजय यादव (वय १९, रा. सुखसागर नगर, कात्रज), गणेश ज्ञानेश्वर कुर्ह (वय ३६), राहुल आनंदा कांबळे (वय ३६), रुपेश आनंदा कांबळे (वय ३८), हसमुख जसवंतभाई पटेल (वय ३१) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.राजेश कानाबार यांच्यावर गोळीबार करुन त्यांचा खुन केल्यानंतर गुन्ह्यातील आरोपी राजेश साळुंके, राकेश बुरटे रोहीत यादव यांच्यासोबत पोलिस हवालदार परमेश्वर सोनके हा चंदनगर येथील एका हॉटेलमध्ये बैठकीस रात्री साडेनऊ वाजता बसल्याचे सीसीटिव्हीच्या विश्लेषणावरून निष्पन्न झाले आहे. आरोपी आणि सोनके हे त्या ठिकाणी बसल्याबाबत हॉटेलचालकानेही दुजोरा दिला आहे. सोनके याच्या संपर्कात आरोपी आले असतानाही, त्याने आरोपींना पोलिसांसमोर हजर न करता पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही.सोनके याने आरोपींना मदत करण्याच्या हेतूने कृत्य केल्याने, पोलिस दलाची शिस्त मलीन केल्याने, पोलिस शिस्तीस बाधा आणणारे असल्याने आरोपींना मदतकरणारे असल्याने निष्काळजीपणा व बेजबाबदारपणाने गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबनाचे आदेश काढले आहेत.

टॅग्स :suspensionनिलंबनPoliceपोलिसMurderखूनPuneपुणे