शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस शिपायावर गुन्हा दाखल; लाच घेताना कोंढव्यात एसीबीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 22:26 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा

ठळक मुद्देपोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे (वय ३२) आणि पोलीस शिपाई गोपाळ हरी दाभाडे (वय २५, रा़ कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलातक्रारदार यांच्या नातेवाईकाला कोंढवा पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

पुणे - अटक केलेल्या नातेवाईकाला जामीन मिळावा यासाठी मदत करण्यासाठी १ लाख रुपयांची मागणी करुन पोलीस उपनिरीक्षकासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कोंढव्यात सापळा रचून एका दुकानदाराला पकडले आहे.

पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे (वय ३२) आणि पोलीस शिपाई गोपाळ हरी दाभाडे (वय २५, रा़ कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्यासाठी लाच घेणारा मसाला व्यापारी राजू उस्मान अत्तार (वय ४८, रा़ कोंढवा) याला अटक केली आहे़ भीमराव मांजरे हे कोंढवा पोलीस ठाण्यात प्रोबेशनरी म्हणून नियुक्त आहेत. तर पोलीस शिपाई गोपाळ दाभाडेही कोंढवा पोलीस ठाण्यात नियुक्तीवर आहेत.

तक्रारदार यांच्या नातेवाईकाला कोंढवा पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्या नातेवाईकाला जामीन करण्यास मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मांजरे यांनी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची लाच मागितली होती़ तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली़ त्यांच्या तक्रारीची पडताळणी भीमराव मांजरे याने १ लाख रुपयांची मागणी केल्याचे व तडजोडीनंतर २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले़ पैसे देण्याच्यावेळी मांजरे व दाभाडे यांनी तक्रारदाराबरोबर क्रॉन्फरन्स कॉलवर बोलून ही रक्कम राजू अत्तार या दुकानदाराकडे देण्यास सांगितले़ अत्तार याचे अत्तार मसालेवाले या नावाने दुकान आहे़ पोलिसांनी तेथे सापळा रचला़ तक्रारदारकडून २० हजार रुपये घेताना राजू अत्तार याला पकडण्यात आले़ दरम्यान, मांजरे आणि दाभाडे पळून गेले असून त्यांचा शोध सुरु आहे.  कोंढवा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी केले आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPuneपुणेArrestअटकPoliceपोलिस