सोन्याची नकली नाणी प्रकरणी पोलिसांचे चार गावांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 10:41 IST2021-05-12T10:39:17+5:302021-05-12T10:41:15+5:30
Khamgaon Crime News : मोठया प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आणि दोन कट्टर आरोपी ताब्यात घेतले.

सोन्याची नकली नाणी प्रकरणी पोलिसांचे चार गावांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन!
खामगाव: अंत्रज येथील सिनेस्टाईल कारवाई नंतर बुधवारी पहाटे पोलिसांनी खामगाव तालुक्यातील चार गावामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. यात मोठया प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आणि दोन कट्टर आरोपी ताब्यात घेतले. ३१ लाखांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.
गत आठवड्यात अंत्रज येथील कारवाईनंतर लागलीच पोलिसांनी अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिह राजपुत यांच्या नेतृत्व वात बुधवारी पहाटे रोहणा, हिवरखेड, कंझारा आणि अंत्रज शिवारात कोंबिग ऑपरेशन राबविले. यामध्ये देशी पिस्तुल, तलवारी, भाले आणि मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, पो.नि सुनील अंबुलकर, संतोष ताले, सुनील हूड, रफिक शेख, गौरव सराग आदींनी केली.