शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

इंदूरपासून पोलिसांनी केला पाठलाग; सिगारेट ओढण्यासाठी 'तो' बाल्कनीत आला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 16:37 IST

Fraud Case : पंचवटीत आवळल्या मुसक्या; इंदूरहून साध्या वेशात पोलिसांकडून खासगी कारने पाठलाग

ठळक मुद्देपोलिसांनी सुमारे ५० हून अधिक मोबाइलचे ‘सीडीआर’ तपासले. तसेच या दहा दिवसांत २५०० किमीपर्यंतचा प्रवास पथकाने केल्याचे समजते.झंवर हा घराच्या बाल्कनीमध्ये लाल रंगाच्या टी-शर्टवर धूम्रपानासाठी आलेला दिसला पोलिसांनी तात्काळ नियोजनबद्धरीत्या सापळा रचला आणि झंवरला शिताफीने ताब्यात घेत वाहनात डांबले.

अझहर शेखनाशिक : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेत (बीएचआर) झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारातील मुख्य संशयित असलेल्या सुनील देवकीनंदन झंवर (५९) हा मागील दहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. ज्या घरात तो विश्रांतीसाठी थांबला त्याच घराच्या बाल्कनीत मंगळवारी (दि.१०) सकाळी झंवर याने धूम्रपानाची तलफ भागविण्यासाठी सिगारेट ओढली अन‌् याचवेळी त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांना झंवर अचूकपणे ‘स्पॉट’ झाला अन‌् पोलिसांनी त्या घराची घेराबंदी करत झंवरच्या शिताफीने मुसक्या बांधल्या.

सातत्याने वेशांतर करत पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची नजर चुकवीत अन् वारंवार मोबाइल लोकेशन बदलून झंवर हा कधी मुंबई, इंदूर तर कधी उज्जैन आणि राजस्थानमध्ये आश्रय घेत होता. मात्र, पुणे पोलिसांनीही तपासाची चिकाटी दाखवीत तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने झंवर वापरत असलेले मोबाइल इंटरनेट डोंगलचे लोकेशन ‘ट्रेस’ करत त्याच्या मागावर कायम राहिले. झंवरला कुठल्याही परिस्थितीत ताब्यात घेत न्यायालयापुढे उभे करायचे, असा चंग बांधलेल्या पुणे पोलिसांनी नाशिकच्या गोदाकाठी पंचवटीत शिताफीने मंगळवारी सकाळीच ताब्यात घेतले.दहा दिवसांपासून पुणे पोलीस मागावरपुणे पोलिसांचे पथक मागील दहा दिवसांपासून झंवरच्या मागावर होते. इंदूरमध्ये पोलिसांना झंवरचे लोकेशन मिळालेही होते; परंतु तेथे तो निसटून जाण्यास यशस्वी ठरला. तो सातत्याने वेगवेगळे मोबाइल वापरत लोकेशन बदलत होता. पोलिसांनी सुमारे ५० हून अधिक मोबाइलचे ‘सीडीआर’ तपासले. तसेच या दहा दिवसांत २५०० किमीपर्यंतचा प्रवास पथकाने केल्याचे समजते. इंदूरहून सुमारे ४३० किमीचा प्रवास करत झंवरचा पोलिसांनी साध्या मारुती इको कारने पाठलाग सुरू ठेवत नाशिकमधील पंचवटी गाठले.कारवरून झंवरचा सुगावासोमवारी मध्यरात्री झंवर दिंडोरी रोडवरील पंचवटी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका वसाहतीत शिरला अन‌् अंधारात गायब झाला. पोलिसांनी त्या वसाहतीत प्रवेश करत गस्त सुरू ठेवली असता एका घराबाहेर त्यांना अनोळखी कार नजरेस पडली. पोलिसांनी या कारवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. कारची माहिती घेतली असता ती त्याचा मुलाच्या नावावर असल्याचे लक्षात आले अन‌् पोलिसांचा संशय अधिकच बळावला.

मध्यरात्री झाला गायब अन‌् पहाटे आला ‘उजेडात’दबा धरून असलेल्या पोलिसांनी तो झंवर नसल्याची खात्री पटविली आणि ॲलर्ट होत काही अंतर त्यांची कार पुढे घेत वाहनातूनच लक्ष केंद्रित केले असता झंवर हा घराच्या बाल्कनीमध्ये लाल रंगाच्या टी-शर्टवर धूम्रपानासाठी आलेला दिसला पोलिसांनी तात्काळ नियोजनबद्धरीत्या सापळा रचला आणि झंवरला शिताफीने ताब्यात घेत वाहनात डांबले. झंवरने ज्या घरात मध्यरात्रीपासून विश्रांती घेतली होती, ते त्याच्या मामाचे असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीNashikनाशिकPoliceपोलिसSmokingधूम्रपानArrestअटक