इंटरनेटद्वारे वेश्याव्यवसायाचे रॅकेट पोलिसांनी केले उध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 10:07 PM2019-09-30T22:07:26+5:302019-09-30T22:09:10+5:30

चौकशीत हे तीनजण परदेशी महिलांनाही वेश्या व्यवसायात ओढत असल्याचं उघडकीस आलं आहे.

Police bursted prostitution racket which was running via internet | इंटरनेटद्वारे वेश्याव्यवसायाचे रॅकेट पोलिसांनी केले उध्वस्त

इंटरनेटद्वारे वेश्याव्यवसायाचे रॅकेट पोलिसांनी केले उध्वस्त

Next
ठळक मुद्देगुल्ली नमन यादव (३३), संतोष व्ही यादव (३६), अशोक यादव (३८) अशी या तिघांची नावे या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.सोशल मिडियावर जाहिरात करून त्या खाली संपर्क करण्यासाठी मोबाइल नंबर टाकायचे.

मुंबई - इंटरनेटवर  Mumbai Escort, VIP Celebrity, Hot GF या पेजद्वारे वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष - १० च्या पोलिसांनी पर्दाफाश करून ३ जणांना अटक केली आहे. गुल्ली नमन यादव (३३), संतोष व्ही यादव (३६), अशोक यादव (३८) अशी या तिघांची नावे असून यांच्या समीर यादव या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहे. चौकशीत हे तीनजण परदेशी महिलांनाही वेश्या व्यवसायात ओढत असल्याचं उघडकीस आलं आहे.

अंधेरी परिसरातील उच्चभ्रू वस्तीत इंटरनेटवर Mumbai Escort, VIP Celebrity, Hot GF या नावाने भारतीय आणि परदेशातील महिलांच्या मदतीने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष १० च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस आरोपीच्या मागावर होते. आरोपीची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे आरोपींशी संपर्क साधला. अंधेरी येथील भगतसिंग काॅलनी, जेबीनगर येथील आखून हाॅटेल राॅयल ईलाइट येथे भेटण्याचं दोघांनी ठरवलं. ठरल्याप्रमाणे पोलिसांनी पाठवलेला ग्राहक हाॅटेलमध्ये आरोपींना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी पोलिसांनी तिन्ही आरोपींना रंगेहाथ अटक केली. या तिघांवर गुन्हा नोंदवून पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली आहे. आरोपी मुलीच्या घरची हलाखीची परिस्थिती पैशांचे आमीष दाखवून या व्यवसायात आरोपींनी ओढले. त्यानंतर सोशल मिडियावर जाहिरात करून त्या खाली संपर्क करण्यासाठी मोबाइल नंबर टाकायचे. त्या मोबाइलवर संपर्क करणाऱ्यांना भारतीय आणि परदेशी महिलांचे फोटो पाठवून आकर्षित केलं जाय असे. या व्यवहारात आरोपी निम्मी रक्कम स्वतःकडे ठेवून घ्यायचे. यापूर्वी अशा प्रकरणात तिन्ही आरोपींची नावे पुढे आली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Police bursted prostitution racket which was running via internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.