शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

ऑनलाईन रॅकेटचा पर्दाफाश! कढीपत्त्याच्या नावाखाली Amazon वरून तब्बल 1 टन गांजाची तस्करी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 10:55 IST

Crime News : शॉपिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅमेझॉनवरून चक्क एक टन गांजाची तस्करी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - सध्या ऑनलाईन वस्तू मागवण्यासकडे ग्राहकांचा अधिक कल असतो. ई-कॉमर्स कंपन्या देखील विविध प्रकारच्या भन्नाट ऑफर्स आणि मोठी सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करत असतात. पण याच दरम्यान अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडतात. तर काही जण या ऑनलाईन पद्धतीचा चुकीचा वापर करतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. शॉपिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅमेझॉनवरून चक्क एक टन गांजाची तस्करी करण्यात आली आहे. पोलिसांनी या ऑनलाईन रॅकेटचा पर्दाफाश केला असून दोन आरोपींना अटक केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने कढीपत्त्याच्या नावाने थेट गांजाची विक्री केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील भिंडमध्ये पोलिसांनी शनिवारी ऑनलाईन गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून टोळीच्या दोन सदस्यांना अटक करण्यात यश आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून 20 किलो अमली पदार्थ जप्त केला आहे. भिंडचे पोलीस अधीक्षक (एसपी) मनोज कुमार सिंह यांनी माहिती मिळाल्यावर कल्लू पवैया (30) आणि ढाबा मालक बृजेंद्र तोमर (35) यांना शनिवारी भिंडमधील ग्वाल्हेर रोड येथून अटक करण्यात आली. आरोपींकडून जवळपास 20 किलो गांजा जप्त करण्यात आला असल्याचं सांगितलं आहे.

कढीपत्ता विक्रीच्या नावाखाली गांजा तस्करी

"आरोपी कल्लूने विशाखापट्टणम येथे बनावट पॅन क्रमांक आणि जीएसटी क्रमांकासह ऑनलाईन ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनवर कढीपत्ता विकण्यासाठी आपल्या फर्मची नोंदणी केली होती. याद्वारे ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि देशाच्या इतर भागांत कढीपत्त्याच्या नावाने गांजा आयात केला जात होता. या व्यवसायात बृजेंद्र हा कल्लूला मदत करायचा. कल्लूने आतापर्यंत एक टन गांजा विकून एक कोटी दहा लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे" अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.  

बनावट पॅन नंबर आणि जीएसटी नंबरद्वारे कंपनी चालवली

कल्लूने आपली कंपनी बनावट पॅन नंबर आणि जीएसटी नंबरद्वारे कंपनी चालवली आणि या व्यवसायात ई-कॉमर्स कंपनीला 66.66 टक्के नफाही मिळाला अशी माहिती एसपी मनोज कुमार सिंह यांनी दिली. आरोपी एका आघाडीच्या ई-कॉमर्स कंपनीच्या माध्यमातून त्यांची टोळी चालवत होते आणि या कंपनीला दोन तृतीयांश नफाही मिळत होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ई-कॉमर्स कंपनीवर अशा अंमली पदार्थांच्या व्यापारासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल कारवाई केली जाऊ शकते का याबाबत तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीamazonअ‍ॅमेझॉनPoliceपोलिस