शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कडेकोट पोलीस बंदोबस्तात बाप्पांचे आगमन; लालबागच्या राजासाठी वाढीव कुमक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2019 7:25 PM

मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणी एक विशेष कंमाड कंट्रोल सेंटर उभारले आहे.

ठळक मुद्दे १२०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मुंबई - महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन आज मोठ्या थाटामाटात झालं आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये यासाठी शहरात पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. १२०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचा वापर करणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाला होणारी बाहू गर्दी लक्षात घेता. मुंबईपोलिसांनी त्या ठिकाणी एक विशेष कंमाड कंट्रोल सेंटर उभारले आहे. त्याचप्रमाणे राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी १ अतिरिक्त सहपोलीस आयुक्त, १२ पोलीस उपायुक्त, २०० पोलीस निरीक्षक, ८०० कर्मचारी, १ एसआरपीएफ, २ सीसीटिव्ही व्हॅन, काेम्बिंग ऑपरेशन पथक, प्रत्येक प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर, हँड डिटेक्टर सह १२०० जणांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.   वाहतूक पोलिसांनीही गणपती उत्सवादरम्यान काही मार्गांमध्ये बदल केले आहेत. मुंबईत ७६१० सार्वजनिक गणपती मंडळ असून काही ख्यातनाम मडळांच्या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन समाजकंटकांनी घातपात घडवू नये, याकरता मुंबई पोलिसांनी ४४ हजाराचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महत्वाच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस गस्तीवर असणार आहेत. शहरात बसवण्यात आलेल्या ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवलं जाणार असून स्थानिक मंडळांना पोलीस दिवसभरात ३ ते ४ वेळा भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मंडळांना सीसीटीव्ही लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी अल्पवयीन मुले, वृद्ध आणि महिलाच्या सुरक्षेसाठी स्पेशल स्काॅड तैनात राहणार आहे. गर्दीच्या ठिकाणी छेडछाडीचे प्रकार होऊ नयेत. यासाठी २०० हून अधिक महिला पोलिसही गणोशोत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. यासह ६ राज्य राखीव दल आणि पॅरामिलेटरी फोर्स, ३ हजार ६०० वाहतूक पोलीस, सशस्त्र दलाचे १०० जवान आणि हॅमरेडिओचे ३५ स्वयंसेवक असा मुंबई पोलिसांचा आणि एनजीओंचा मोठा बंदोबस्त मुंबई शहरात गणेशोत्सव काळात असणार आहे. त्यासह पोलिसांच्या मदतीला ट्रेनी पोलीस, होमगार्डचे जवान, नागरी संरक्षण दलाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापनाचे स्वयंसेवक, नागरी सरंक्षण दलाचे जवान, एनएसएसचे विद्यार्थी, स्काऊट गाईडचे विद्यार्थी असणार आहेत.

•मुंबई शहरात  गणपतींची संख्या- घरगुती गणपती १ लाख ३२ हजार ४५२- गौरी स्थापना ११ हजार ६६७- सार्वजनिक मंडळ ७ हजार ७०३- विसर्जन स्थळ - १२९

- ५ हजार सीसीटीव्हीद्वारे मुंबईवर लक्ष- राज्य राखीव पोलीस दल १ कंपनी- डिएफएमडी २०, एचएचएमडी ५०- २ सीसीटीव्ही व्हॅन, ४ काॅम्बेक्ट व्हॅन

 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईLalbaugcha Rajaलालबागचा राजाGanpati Festivalगणेशोत्सव