शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पार्थ पवारांसाठी पैसे वाटप; शेकाप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 19:42 IST

शेकाप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामोठे येथे मतदारांना पैसे वाटप करताना पकडले आहे.

ठळक मुद्देशेकाप कार्यकर्त्यांकडून 11 हजार 900 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.  कामोठे पोलिसांनी मतदारांना पैशाचे आमिष दाखविले या कारणासाठी भा. द.वि. कलम १७१ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबई : मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पोलिसांनी ताब्यात घेलले आहे.  शेकाप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामोठे येथे मतदारांना पैसे वाटप करताना पकडले आहे. मतदारांना प्रत्येकी 400 रुपयांचे वाटप करताना रंगेहाथ ही कारवाई करण्यात आली आहे.

शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप होत असल्याचे शिवसेना कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पकडून कामोठे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असून 11 हजार 900 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. 

भरारी पथक क्रमांक २ मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे संदीप रामकृष्ण पराडकर, वैभव विठोबा पाटील अशी आहेत. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 11 हजार 900 रुपये रोख, सत्यकुंज कॉम्प्लेक्स कामोठे येथे हाताने लिहिलेली मतदार यादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे निवडणूक चिन्ह, फोटो व नावे असलेली यादी सापडली. 

चरणदीपसिंग, बलदेव सिंग, विकास नारायण घरात (नगरसेवक पनवेल मनपा) , महेंद्र जगन्नाथ भोपी, विजय त्रिंबक चिपळकर (नगरसेवक पनवेल मनपा) यांनी या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. कामोठे पोलिसांनी मतदारांना पैशाचे आमिष दाखविले या कारणासाठी भा. द.वि. कलम 171 (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMONEYपैसाPoliceपोलिस