शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 23:33 IST

१९ डिसेंबर रोजी त्याला ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्याने त्याची रवानगी आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात केली आहे.

ठाणे - नौपाड्यातील एका २७ वर्षीय तरुणीला मेसेज पाठवून व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून अश्लील बोलून नेहमीच पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या राम लाळगे (३५, रा. इंदिरानगर, ठाणे) या कपडेविक्रेत्याला नौपाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याला २७ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

पीडित तरुणीची आणि यातील कथित आरोपी राम यांची आधी ओळख होती. याच ओळखीतून त्यांच्यात मैत्रीही झाली. या मैत्रीचा गैरफायदा त्याने मार्च २०१९ पासून त्याच्या अन्य एका मैत्रिणीच्या मदतीने या तरुणीला तसेच तिच्या आई, बहीण तसेच संगीत शिकविणारे शिक्षक आणि तिच्या कामावरील वरिष्ठ अधिकारी यांना फोन करून तिच्याबद्दल अश्लील बोलून तिची बदनामी केली.

तसेच १४ मार्च ते १४ डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये तिला व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे मेसेज करून तिच्याशी अश्लील भाषेत संवाद साधला. एवढ्यावरच न थांबता तिचा सातत्याने पाठलाग करून तिचा विनयभंग करीत तिची बदनामीही केली. सततच्या या प्रकारामुळे ही तरुणी आणि तिचे कुटुंबीय भीतीच्या छायेत होते. अखेर वारंवार होणाऱ्या या सर्व प्रकाराला कंटाळून या पीडित तरुणीने अखेर याप्रकरणी १४ डिसेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने त्याला १८ डिसेंबर रोजी ठाणे रेल्वेस्थानक परिसरातून अटक केली. १९ डिसेंबर रोजी त्याला ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्याने त्याची रवानगी आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात केली आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटकthaneठाणे