शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

४ हजार रुपयांची लाच घेताना हवालदार अडकला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 21:31 IST

शहर पोलीस ठाण्यात कारवाई; मारहाण प्रकरणातील आरोपीकडून घेतली लाच

ठळक मुद्देशहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला.हिरादास सुखदेव पिल्लारे (४७) असे लाच स्विकारणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. 

गोंदिया - आरोपीकडून ४ हजार रुपयांची लाच घेतांना शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने सापळा रचून बुधवारी (दि.१७) दुपारी रंगेहात पडकले. हिरादास सुखदेव पिल्लारे (४७) असे लाच स्विकारणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार तक्रारकर्त्याच्या मुलाला व इतर दोघांच्या विरोधात गोंदिया शहर पोलीस ठाण्यात १ जुलै रोजी भादंविच्या कलम ३२४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाची विचारपूस करण्यासाठी तक्रारकर्त्याच्या मुलाला पोलीस हवालदार पिल्लारे याने २ जुलै रोजी पोलीस ठाण्यात बोलाविले. यावेळी त्याला अटक करण्याची धमकी दिली. अटक झाल्यावरही लॉकअपमध्ये न टाकण्यासाठी ५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. यासंदर्भात मुलांने आपल्या वडिलाला माहिती दिली. तक्रारकर्त्याने यासंदर्भात १४ जुलै रोजी पोलीस हवालदार पिल्लारे यांची भेट घेतली. त्यावेळी सुध्दा पिल्लारे यांनी त्यांच्याकडून ५ हजार रुपयांची मागणी केली. तुमच्या मुलाला लॉकअपमध्ये न टाकण्याचे ५ हजार रूपये द्या असे म्हटले. तक्रारकर्त्याने १५ जुलै रोजी याप्रकणाची तक्रार भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला केली. १७ जुलै रोजी सापळा रचण्यात आला. त्यानंतर तक्रारकर्त्याकडून ४ हजार रूपयांची लाच घेतांना हिरादास पिल्लारे याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील,पोलीस कर्मचारी रंजीत बिसेन, दिगांबर जाधव, नितिन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, गीता खोब्रागडे, वंदना बिसेन व चालक देवानंद मारबते यांनी केली. शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसArrestअटक