Police arrested upon a teacher who sends obscene messages to student | विद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
विद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे :  घरी शिकवणी घेण्याकरिता येत असलेल्या शिक्षकानेविद्यार्थीनीस अश्लिल मेसेज पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे.  अश्लिल मेसेज पाठवून संबंधित विद्यार्थीनीला मानसिक त्रास देणा-या शिक्षकाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. तिला त्रास दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

विद्यार्थीनीच्या पालकांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात याप्रकारांविषयी तक्रार दिली होती. संदीप कुमार ( वय 35, रा. पोरवाल रस्ता, लोहगाव, मुळ रा. बिहार) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.  पीडीत विद्यार्थीनी सध्या बीसीएचे शिक्षण घेत आहे. दोन वर्षांपुर्वी ती बारावीला असताना तिला भौतिकशास्त्र हा विषय शिकविण्यासाठी तिच्या पालकांनी अभियंता असलेल्या संदीप कुमार या शिक्षकाची निवड केली होती.  संदीप हा घरी येऊन विद्यार्थीनीस शिकविण्यासाठी यायचा.  त्याने विद्यार्थीनीशी  जवळीक साधून तिला लग्नाची मागणी घातली होती.

त्याचप्रमाणे अनेक दिवसांपासून शिक्षकाकडून तिला त्रास दिला जात होता. अखेर या प्रकारास कंटाळून तिने पालकांना यासंबंधी माहिती दिली. त्यानंतर पालकांनी  शिक्षकाला हाकलून दिले. एप्रिल महिन्यापासून त्याने विद्यार्थीनीसह तिच्या पालकांच्या मोबाईलवर अश्लिल मेसेज पाठविण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांनी पोलिसांची मदत घेतली.


Web Title: Police arrested upon a teacher who sends obscene messages to student
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.