शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून हत्या केलेल्या सहा आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 13:57 IST

दीपकच्या डोक्यावर, पाठीवर, हातावर गंभीर वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. 

ठळक मुद्देमुख्य आरोपीवर तद्दीपारीची कारवाई होती अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांची पत्रकार परिषदेत दिली आहे.माणेरे गावातील रहिवासी दिपक भोईर याची हत्या करण्यात आली होती. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.

उल्हासनगर - दीपक भोईर हत्या प्रकरणी सहा आरोपी काही तासात पोलिसांनी गजाआड केले असून पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आली होती. आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले असून मुख्य आरोपीवर तद्दीपारीची कारवाई होती अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांची पत्रकार परिषदेत दिली आहे.उल्हासनगरात मध्यरात्रीच्या सुमारास धीरु बारच्या आवारात एका तरुणाची तीक्ष्ण हत्याराने हत्या झाल्याची घटना समोर आली होती. आठ ते दहा जणांच्या टोळीने हा हल्ला केला. मध्यरात्री धीरु बारच्या आवारात दोन गटात झालेल्या वादाचे रूपांतर हत्येमध्ये झाले. माणेरे गावातील रहिवासी दिपक भोईर याची हत्या करण्यात आली होती. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.

खून करून पळून जाणाऱ्या उल्हासनगरच्या चौघांना पकडले, धुळे एलसीबीची कारवाई

नरेश रामसिंग चव्हाण, योगेश सुभाष लाड, राजू मनोहर कनोजीया, अनिकेत विठोबा क्षीरसागर यांनी खून केला. खून केल्यानंतर चौघही आरोपी उल्हासनगर येथून धुळे मार्गे मध्यप्रदेशात एका खाजगी प्रवासी बसने पळून जात होते. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दित हॉटेल द्वारकाजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ २२ रोजी पहाटे सापळा लावला. खाजगी बसला पाठलाग करून थांबवून त्यात असले संशयित आरोपी यांना चौकशीसाठी मोहाडी पोलीस स्टेशनला नेले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी दीपक भोईर (रा. उल्हासनगर) याचा खून केल्याची कबुली दिली. 

माणेरे गावातील रहिवासी दीपक भोईर नामक तरुणावर मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगरच्या धीरु बारच्या आवारात आरोपी नरेश उर्फ बबल्या चव्हाण व त्याच्या सात ते आठ साथीदारांनी तीक्ष्ण हत्याराने दीपकवर जीवघेणा हल्ला केला. यात दीपकच्या डोक्यावर, पाठीवर, हातावर गंभीर वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. 

 

टॅग्स :ArrestअटकMurderखूनDhuleधुळेulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिस