झारखंड - पलामू जिल्ह्यात पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी छतरपूर अनुमंडल येथून या पाचजणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले नक्षलवादी हे टीपीसी संघटनेशी संबंधित आहेत.अटक केलेल्या नक्षलवाद्यांकडून दोन मोटरसायकल, चार मोबाईल फोन, ह्त्यारं, टीपीसी संघटनेशी संबंधित कागदपत्रे आणि अन्य आपत्तीजनक साधनसामग्री पोलिसांनी हस्तगत केली आहे. सध्या पोलीस सर्व अटक नक्षलवाद्यांची चौकशी करत आहेत. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नवा बाजारमधून विजय सिंहला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत उघड झालेल्या माहितीवरून मुरुमदाग पंचायत क्षेत्रातील गरारखांड जंगलात छापेमारी करून इतर चार नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अटक नक्षलवाद्यांच्या चौकशीत पाचजण टीपीएस/ टीएसपीसी या संघटनेचे सदस्य आहेत.
झारखंडमध्ये पाच नक्षलवाद्यांना पोलिसांनी केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 16:09 IST
अटक केलेले नक्षलवादी हे टीपीसी संघटनेशी संबंधित आहेत.
झारखंडमध्ये पाच नक्षलवाद्यांना पोलिसांनी केले जेरबंद
ठळक मुद्देअटक नक्षलवाद्यांच्या चौकशीत पाचजण टीपीएस/ टीएसपीसी या संघटनेचे सदस्य आहेत. दोन मोटरसायकल, चार मोबाईल फोन, ह्त्यारं, टीपीसी संघटनेशी संबंधित कागदपत्रे आणि अन्य आपत्तीजनक साधनसामग्री पोलिसांनी हस्तगत केली आहे.