शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकराला चंदननगर पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 14:49 IST

प्रेयसीचे दुसऱ्याशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून प्रियकराने चाकूने वार करून खून केल्याची घटना चंदननगर येथे घडली होती.

ठळक मुद्देखुनाचा गंभीर गुन्हा करून आरोपी झाला होता फरार

विमाननगर : प्रेयसीचे दुसऱ्याशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून प्रियकराने चाकूने वार करून खून केल्याची घटना चंदननगर येथे घडली होती. या प्रकरणी फरार आरोपी किरण अशोक शिंदे (वय-26, रा. काळेवाडी, थेरगाव पुणे) याला चंदननगर पोलिसांनी नुकतीच अटक केली. आरोपी किरण शिंदे याने 11 जून रोजी प्रेयसी विना पटले हिचा चाकूने वार करून चंदननगर पाण्याच्या टाकीजवळ खून केला होता. खुनाचा गंभीर गुन्हा करून आरोपी फरार झाला होता. चंदननगर पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याला नुकतीच अटक करून न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी विना पटले या युवतीचा एका तरुणाने चाकूने वार करून खून केल्याची घटना चंदननगर येथे घडली होती. आरोपी खून करून फरार झाला होता. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज व इतर महत्त्वपूर्ण माहितीवरून हा खून विना पटलेचा मित्र किरण शिंदे यांनी केल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपासात किरण हा खुनाचा गुन्हा करून अहमदनगर व इतर भागात फिरत होता.त्यानंतर सात दिवसांपूर्वी त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तो रावेत येथे एका खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याची माहिती चंदननगर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार चंदननगर पोलिसांनी आरोपी किरण शिंदे याला रुग्णालयातून उपचार पूर्ण झाल्यावर ताब्यात घेऊन अटक केली.आरोपी  किरण शिंदे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा तपास परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, गुन्हे निरीक्षक राजेंद्र काळे, उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी सहाय्यक पोलीस फौजदार बारगुजे, पोलीस शिपाई भाऊ चव्हाण व अमित जाधव यांच्या पथकाने केला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखूनArrestअटक