शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी दिल्लीतील प्रियकरास पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 19:32 IST

आपल्याकडे अद्भुतशक्ती असून त्याचा वापर करून मुख्य भूमिका मिळवून देतो असे आमिष त्याने दाखवले होते. ठाणे न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. 

ठळक मुद्देमीरारोडच्या शिवार उद्यान परिसरातील रॉयल नेस्ट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सेजल शर्मा (२६) हिने शुक्रवार २४ जानेवारी रोजी बेडरूम मधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

मीरारोड - मीरारोडमध्ये राहणाऱ्या सेजल शर्मा या मालिका व जाहिरातीत काम करणाऱ्या अभिनेत्रीने जानेवारीमध्ये केलेल्या आत्महत्येप्रकरणी तिच्या दिल्लीतील प्रियकरास मीरारोड पोलिसांनी अटक केली आहे. आपल्याकडे अद्भुतशक्ती असून त्याचा वापर करून मुख्य भूमिका मिळवून देतो असे आमिष त्याने दाखवले होते. ठाणे न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. 

मीरारोडच्या शिवार उद्यान परिसरातील रॉयल नेस्ट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सेजल शर्मा (२६) हिने शुक्रवार २४ जानेवारी रोजी बेडरूम मधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दिल्लीतील तिचा प्रियकर आदित्य वशिष्ठ ( ३०) यानेच पोलिसांना फोन करून सेजलने आत्महत्या करणार असल्याचे सांगितल्याचे कळवले होते. पहाटे पोलिसांनी सेजलच्या घरी धाव घेतली असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती . तिने अत्म्हत्ये पूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत कोणी जबाबदार नसल्याचे लिहले होते. परंतु सेजलच्या आईने पोलिसांना तक्रार करून आदित्य आणि सेजलमध्ये भांडणं होत असल्याचे सांगितले होते.त्या अनुषंगाने सेजल आत्महत्या प्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ . शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपअधीक्षक शांताराम वळवी यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम व मीरारोड पोलिसांनी चालवला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , पोलिसांनी वशिष्ठ याला तपासकामी बोलावले असता तो उडवा उडवीची उत्तरे देत होता . वशिष्ठची सेजल सोबत ओळख २०१८ सालात सुमारे दिड वर्षां पूर्वी झाली होती . तो देखील मालिका - सिने क्षेत्रात नशीब चमकावण्यासाठी आला होता . यातूनच दोघांची ओळख व पुढे जवळीक झाली . त्याला मालिका आदी क्षेत्रात संधी मिळाली नसली तरी तो दिल्ली वरून सेजल भेटण्यास येत असे.मूळची राजस्थानच्या उदयपूरची असणारी सेजल "दिल तो हॅप्पी है जी"  या मालिकेत काम करत होती . या शिवाय तिने अभिनेते आमिर खान , क्रिकेटपटू हार्दिक पंड्या सोबत जाहिरातीत काम केले होते . "दिल तो हॅप्पी है जी" हि मालिका बंद पडल्याने गेल्यावर्षी ऑगस्ट पासून तिच्या कडे दुसरे काम नव्हते.दरम्यान आरोपीने आपल्याला अद्भुत शक्ती असून त्या बळावर मी तुला मालिका आणि चित्रपटात प्रमुख भूमिका मिळवून देणार असल्याचे आमिष सेजल हिला दिले होते . दोघां मध्ये भांडणे होत होती . आरोपीने काही कारण सांगून पैसे घेतले असल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे . पोलिसांना दोघां मध्ये झालेले चॅटिंग आदी सापडले आहे . जादूटोणा कायद्या सह आत्महत्येस प्रवृत्त करणे , फसवणूक करणे प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ . शशिकांत भोसले यांनी सांगितले कि ,  गुरुवारी आम्ही आदित्य वशिष्ठ ह्या आरोपीला सेजल शर्माच्या आत्महत्येप्रकरणी अटक केली आहे. त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या बाबत पोलीस तपास करत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

टॅग्स :ArrestअटकSuicideआत्महत्याPoliceपोलिसdelhiदिल्लीmira roadमीरा रोड