शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीत आरोपीला पिस्तुलसह अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 13:27 IST

चिखली येथे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला निगडी पाेलिसांनी सापळा रचून अटक केली अाहे.

पिंपरी : सराईत आरोपीला गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत कडतुसांसह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई निगडी पोलिसांनी बुधवारी रात्री केली.  चिखली येथे  आरोपींकडून एकूण ४५ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संजय दामू नानेकर (वय २१, रा. चाकण, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचोरी, सोनसाखळी चोरी अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी निगडी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. ही पथके निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पथकातील पोलीस नाईक संदीप पाटील यांना त्यांच्या सूत्रांकडून माहिती मिळाली की, एक इसम चिखली येथे थांबला आहे. त्याच्याजवळ गावठी पिस्तुल आहे. त्यानुसार वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन चिखली रस्त्यावर सापळा लावून संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ४५ हजार २०० रुपयांचा ऐवज मिळाला. आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, लक्ष्मण सोनवणे, पोलीस कर्मचारी तात्या तापकीर, संदीप पाटील, किशोर पढेर, विलास केकाण, आनंद चव्हाण,चेतन मुंढे स्वामीनाथ जाधव, मच्छिंद्र घनवट यांच्या पथकाने केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हाnigdiनिगडीPoliceपोलिस