शहरं
Join us  
Trending Stories
1
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
2
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
3
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
4
हार्दिक पांड्याने खरंच माहिका शर्मासोबत साखरपुडा केला? पूजाविधी करणारे पंडितजी म्हणाले...
5
आलिशान कार, गर्लफ्रेंड, चोरी, नाकाबंदी... नर्सिंगची विद्यार्थिनी बनली बॉयफ्रेंडची क्राइम पार्टनर
6
Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
7
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
8
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
9
IND vs SA : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! मोर्कोसह पहिल्या डावात द.आफ्रिकेनं साधला मोठा डाव
10
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
11
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
12
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
13
पोलीस कॉन्स्टेबल होता ७ कोटींच्या लुटीच्या टोळीचा ट्रेनर; ३ महिन्यांचे नियोजन अन् RBI अधिकारी बनून केली लूट
14
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
15
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
16
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
17
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
18
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
19
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
20
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंधास नकार देऊन गालावर मारली चापट; रागाच्या भरात आरोपीने केली विवाहितेची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 17:37 IST

नाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी २४ तासांमध्ये अटक केली

Nashik Crime: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ येथील विवाहित महिलेची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर संशयित आरोपीला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. प्रेमसंबंधास नकार दिल्यानंतर आरोपीला महिलेने कानाखाली मारली होती. त्याच रागाच्या भरात आरोपीने महिलेच्या डोक्यावर वार करुन तिला संपवले. या घटनेनंतर आरोपीने तिथू पळ काढला होता. पोलिसांनी केवळ वर्णनाच्या आधारेच आरोपीला अटक केली आहे.

खरवळ येथील वीरनगरमधील महिला वैशाली नामदेव चव्हाण (४०) सायंकाळी शेतावरून घरी परतत असताना रस्त्यावर पडून तिच्या डोक्याला जखम होऊन जखमी अवस्थेत मिळाली. तिला नातेवाइकांनी हरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर महिलेला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर हरसूल पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, तसेच महिलेचे पती नामदेव चव्हाण यांनी चर्चा केली. डोक्याच्या पाठीमागे झालेल्या जखमेवरून महिला ही रस्त्यावरून पडून जखमी झालेली नसून तिचा घातपात झाल्याचा अंदाज व्यक्त केला गेला. यावरून वैशालीचा अज्ञात इसमाने खून केल्याची खात्री पटली. यानंतर, पती नामदेव चव्हाण यांनी हरसूल पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. 

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी तपासाची चक्रे तातडीने फिरविली. गुप्त माहितीच्या आधारे संध्याकाळच्या सुमारास वीरनगर येथे घटनास्थळाच्या आजूबाजूला अज्ञात गुन्हेगाराचा शोध चालू केला. यावेळी महिलेच्या शेताजवळील एका शेतकऱ्याने वैशाली चालत जात असलेल्या रस्त्याच्या दिशेने एक उंच इसम धावत जाताना पाहिला होता असं सांगितले. वैशालीच्या घरी तसेच तिच्या पतीकडे पत्ता विचारण्यासाठी एक जण येऊन गेल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांच्याकडून त्या अज्ञात इसमाचे वर्णन जाणून घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, काळा शर्ट त्यावर पांढरा पट्टा आणि निळसर रंगाची पॅण्ट घातलेल्या अनोळखी इसमाविरुद्ध हरसूल पोलिस ठाण्यामध्ये महिलेच्या पतीने फिर्याद दाखल केली. अंगावरच्या कपड्याच्या वर्णनावरून आरोपीचा शोध घेण्यास हरसूल पोलिसांनी सुरुवात केली. त्यावेळी वीरनगर भागात भगवान पांडुरंग शिंदे हा संशयित इसम फिरताना आढळल्याचे परिसरातील ग्रामस्थांनी सांगितली. याबाबत महिलेच्या पतीकडे खात्री केल्यानंतर हरसूल पोलिसांनी तपास पथक तयार करून मुसळधार पावसात भगवान पांडुरंग शिंदे यास ताब्यात घेतले.

आरोपी भगवान पांडुरंग शिंदे यापूर्वी या महिलेकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी करण्यासाठी आला होता, पण त्यास नकार मिळाला. त्यानंतर, पुन्हा घटनेच्या दिवशीही आरोपीने मयत महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणी केली. यावेळी या महिलेने आरोपीच्या गालात चापट लगावल्याने आरोपीला राग अनावर झाला. त्याने जवळ पडलेल्या लाकडी दांड्याने डोक्यात वार करत तिची हत्या केली. त्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस