शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 05:58 IST

मेहता ब्रिटनचा नागरिक असून गेल्या ३५ वर्षांपासून हाँगकाँगमध्ये राहतो. पीनबी घोटळ्याप्रकरणी  सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात तो आरोपी आहे.

मुंबई - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याशी संबंधित फरार आरोपी नीरव मोदी याचा मेव्हणा मयंक मेहता याला विशेष सीबीआय न्यायालयाने ‘माफीचा साक्षीदार’ म्हणून घोषित केले आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी २२ सप्टेंबरला मेहताच्या माफीच्या अर्जास मान्यता दिली.  तो खरी परिस्थिती, तसेच गुन्ह्यात सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीबाबत खुलासा करेल, अशी अट न्यायालयाने त्याला माफीचा साक्षीदार करताना घातली.

माफीच्या आदेशानंतर संबंधित आरोपीला या खटल्यात माफीचा साक्षीदार म्हणून नोंदवले जाईल, असे आदेशात म्हटले आहे. त्याची प्रत शुक्रवारी उपलब्ध झाली आहे. मेहता ब्रिटनचा नागरिक असून गेल्या ३५ वर्षांपासून हाँगकाँगमध्ये राहतो. पीनबी घोटळ्याप्रकरणी  सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात तो आरोपी आहे. हे प्रकरण भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-ब, ४२० , ४०९ (विश्वासघात) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल केलेले आहे. अर्जात मेहताने स्पष्ट केले होते की, त्याला यापूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) दाखल प्रकरणांत माफी देण्यात आली होती आणि त्या प्रकरणातील मूळ गुन्हा सीबीआयने दाखल केला आहे.  तो सप्टेंबर २०२१ मध्ये तो स्वेच्छेने भारतात आला होता जेणेकरून तो खटल्याच्या कार्यवाहीत सहभागी होऊ शकेल.

मेहताच्या वकिलाचा युक्तिवाद काय?मेहताने माफी मागितली असून त्याने  सर्व परिस्थितींबाबत सत्य खुलासा करण्याची तयारी दर्शवली आहे, असा युक्तिवाद मेहताचे वकील अनिल देसाई यांनी न्यायालयात केला. सरकारी वकील अरविंद आघाव यांनी या अर्जास हरकत घेतली नाही. यापूर्वीही त्याला अशाच पीएमएलए प्रकरणांत माफी देण्यात आल्याचे आघाव यांनी मान्य केले.  

मेहूल चोक्सी व मोदीवर आरोप काय आहेत?फरार हिरे व्यापारी मेहूल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी हे पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. त्या कोट्यवधी घोटाळ्याची चौकशी सीबीआय व अंमलबजावणी संचालनालय (ईडी) करीत आहे. मुंबईतील पीएनबीच्या ब्रेडी हाउस शाखेतील अधिकाऱ्यांना लाच देऊन लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) आणि फॉरेन लेटर ऑफ क्रेडिट्सचा गैरवपार करून तब्बल १३,००० कोटी रुपयांचा निधी खासगी वापरासाठी वळविल्याचा आरोप चोक्सी व मोदीवर आहे. सध्या चोक्सीविरोधात बेल्जियम न्यायालयात प्रत्यार्पणाची कार्यवाही सुरू आहे, तर नीरव मोदी लंडनमधील तुरुंगात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : PNB Scam: Nirav Modi's brother-in-law becomes approver, CBI court approves.

Web Summary : Nirav Modi's brother-in-law, Mayank Mehta, is now an approver in the PNB scam case after CBI court approval. He will reveal details about the crime and involved individuals. Mehta voluntarily came to India to cooperate with the trial.
टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाCBIगुन्हा अन्वेषण विभागCourtन्यायालय