मुंबई - बहुचर्चित पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या ईडीने जप्त केलेल्या महागड्या कार आणि वस्तूंचा २७ फेब्रुवारी आणि ३, ४ मार्चला लिलाव होणार आहे. नामांकित चित्रकारांच्या कलाकृती हे या लिलावाचे खास आकर्षण ठरू शकते. कोट्यावधी रुपयांच्या या कलाकृती ईडीकडून (अंमलबजावणी संचालनालय) लिलावात काढल्या आहेत. नुकतीच ‘ईडी’च्यावतीने सॅफ्रनआर्ट संस्थेने लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ‘सॅफ्रनआर्ट’ने दिलेल्या माहितीनुसार २७ फेब्रुवारीला ४० वस्तूंचा प्रत्यक्ष लिलाव होईल, तर उर्वरित ७२ वस्तूंचा लिलाव ३ आणि ४ मार्चला ऑनलाइन पद्धतीने केला जाईल. हा लिलाव सॅफ्रन आर्ट संस्थेच्या प्रभादेवी येथील कार्यालयात होणार आहे.कोणाची आहेत महागडी चित्रं ?* शेरगील यांचे ‘बॉइज विथ लेमन’* एम. एफ. हुसेन यांचे ‘बॅटल ऑफ गंगा अॅण्ड जमुना, महाभारत १२ * व्ही. एस. गायतोंडे, मनजीत बावा, राजा रवी वर्मा यांचीही चित्रेईडीने जप्त केलेल्या या मालमत्तेचा आता न्यायालयाच्या परवानगीने लिलाव २७ फेब्रुवारी, ३ आणि ४ मार्चला होणार आहे. या लिलावात अमृता शेरगील, एम. एफ. हुसेन, व्ही. एस. गायतोंडे आणि अन्य प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. शेरगील यांचे ‘बॉइज विथ लेमन’ हे चित्र १२ ते १८ कोटी रुपयांना विकले जाईल, असा अंदाज सॅफ्रनआर्ट संस्थेने व्यक्त केला आहे. एम. एफ. हुसेन यांचे ‘बॅटल ऑफ गंगा अॅण्ड जमुना, महाभारत १२’ या चित्राचाही तितक्याच किमतीला लिलाव होईल. त्याखालोखाल व्ही. एस. गायतोंडे, मनजीत बावा, राजा रवी वर्मा यांचीही चित्रे लिलावात असतील.खास आकर्षणआंतरराष्ट्रीय ब्रँडच्या हॅण्डबॅग, मनगटी घडय़ाळंरोल्स रॉईस मोटार
बँकेला ७ हजार ३०० कोटी व्याजासह परत करण्याचे नीरव मोदीला आदेश
नीरव मोदीच नव्हे, तर हे पाच जण घोटाळा करून झाले पसार
पीएनबी घोटाळा; अखेर नीरव मोदी फरार घोषित
PNB Scam : पीएमएलए कोर्टाकडून PNB बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी फरार घोषित