मुंबई - पीएमसी बॅंक खातेधारकांनी मुंबईत किल्ला कोर्टबाहेर आज दुपारी १.४५ जोरदार घोषणाबाजी करत राकेश आणि सारंग वाधवान यांचे वकील अमित देसाई यांच्या कारसमोर येऊन आंदोलन केले. बँकेच्या संतप्त ग्राहकांनी वरियम सिंग चोर है, पीएमसी बँक चोर है आणि आरबीआय चोर है अशा घोषणा देऊन कोर्टाबाहेर रास्तारोको केला. आरोपींना जामीन देऊ नये असे लिहिलेले फलक संतप्त आंदोलनकर्त्यांच्या हातात होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांची समजूत घालून वाहतुकीची कोंडी सोडवली. एचडीआयलचे सारंग वाधवान, राकेश कुमार वाधवान आणि बँकेचे माजी संचालक वरियमसिंग यांना कोर्टाच्या मागील परिसरातून कोर्टात हजर करण्यात आले. या तिघांच्या पोलीस कोठडीत १४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, वाधवान यांच्या वकीलाच्या गाडीवर आंदोलनकर्त्यांनी लाथा मारल्या आणि पाण्याच्या बाटल्या फेकत निषेध व्यक्त करण्यात आला.
Video : पीएमसी बँक चोर है! आरबीआय चोर है!, आंदोलनकर्त्यांनी कोर्टाबाहेर दिल्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 17:23 IST
आरोपींना जामीन देऊ नये असे लिहिलेले फलक आंदोलनकर्त्यांच्या हातात होते.
Video : पीएमसी बँक चोर है! आरबीआय चोर है!, आंदोलनकर्त्यांनी कोर्टाबाहेर दिल्या घोषणा
ठळक मुद्देया आंदोलनादरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांची समजूत घालून वाहतुकीची कोंडी सोडवली.वाधवान यांच्या वकीलाच्या गाडीवर आंदोलनकर्त्यांनी लाथा मारल्या आणि पाण्याच्या बाटल्या फेकत निषेध व्यक्त करण्यात आला.