शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

PMC बॅँक गैरव्यवहार : ईडीची सहा ठिकाणी छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 22:00 IST

सविस्तर तपशील मिळविण्यात येत असल्याचे ईडीतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देईडीने या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला असून अतिरिक्त पुरावे मिळविले जात आहेत. पीएमसी बॅँकेचे देशभरात १३७ शाखा असून ११ हजार कोटीवर ठेवी आहेत.

मुंबई - पीएमसी कोट्यावधीच्या घोटाळ्यात आता सक्तवसूली संचालनालयाने (ईडी)लक्ष घातले असून शुक्रवारी याप्रकरणी मुंबई व परिसरात सहा ठिकाणी छापे घातले. बॅँकेच्या शाखा व संचालक, अधिकाऱ्यांच्या कार्यालये व निवासस्थाने छापे टाकून महत्वपूर्ण दस्ताऐवज जप्त करण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.पीएमसी बॅँकेत गेल्या अकरा वर्षात जवळपास ४ हजार ३३५ कोटीचा घोटाळा झाल्याचे लेखापरीक्षण व प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये बॅँकेचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याने त्यांच्याविरुद्ध मनी लॅण्ड्रींग प्रतिबंधक कायद्यातर्गंत (पीएमएलए) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मुंबईच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरु असून गुरूवारी घोटाळ्याशी संबंधीत हाउसिंग डेव्हल्पमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे (एचडीआयएल) संचालक राकेश वाधवा व त्यांचे बंधू सारंग वाधवा यांना अटक केली आहे. ईडीने या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला असून अतिरिक्त पुरावे मिळविले जात आहेत. आरबीआयने नियुक्त केलेल्या लेखापालने दिलेल्य तक्रारीनंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. पीएमसी बॅँकेच्या भांडूप येथील शाखेतून एचडीआयएलने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. त्यामध्ये अनियमितता असून बॅँकेच्या संचालक, व्यवस्थापक व अन्य अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे ही कर्ज मंजूर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबतचा सविस्तर तपशील मिळविण्यात येत असल्याचे ईडीतील सूत्रांकडून सांगण्यात आले.पीएमसी बॅँकेचे देशभरात १३७ शाखा असून ११ हजार कोटीवर ठेवी आहेत. मात्र आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्याने आरबीआयने या बॅँकेच्या व्यवहारावर निर्बंध घातले आहेत. सभासदांना सहा महिन्यात १० हजार काढण्याची मुभा होती, आता ही मर्यादा २५ हजारापर्यत करण्यात आली आहे. मात्र, या निर्बंधामुळे खातेदारांचे मोठे हाल होत आहेत.

 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPMC Bankपीएमसी बँकraidधाडMumbaiमुंबई