PMC bank scam : Appointment of RBI Retired Officer as Bank Administrator | PMC बँक घोटाळा : आरबीआयच्या निवृत्त अधिकाऱ्याची बँकेचा प्रशासक म्हणून नियुक्ती
PMC बँक घोटाळा : आरबीआयच्या निवृत्त अधिकाऱ्याची बँकेचा प्रशासक म्हणून नियुक्ती

ठळक मुद्देआज सुनावणी होणार असल्याने खातेदारांची हायकोर्टात गर्दी केली होती. रोष व्यक्त करण्यासाठी पीएमसी बँक प्रकरणी सुनावणी पुढे ढकल्याने खातेदारांनी हायकोर्टाबाहेर घोषणाबाजी केली.

मुंबई - पीएमसी पीएमसी बँकेतील आर्थिक घोटाळ्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात आज सुनावणी पार पडली. गुंतवणूकदारांच्या फिटसाठी आखलेल्या उपाययोजनांसंबंधी आरबीआयने हायकोर्टात अहवाल सादर केला आहे. तसेच आरबीआयच्या निवृत्त अधिकाऱ्याची बँकेचा प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती हायकोर्टात देण्यात आली. याप्रकरणी आता पुढील सुनावणी ४ डिसेंबरला ठेवण्यात आली आहे.

आज सुनावणी होणार असल्याने खातेदारांची हायकोर्टात गर्दी केली होती. पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर तैनात होता. तरीदेखील आपला रोष व्यक्त करण्यासाठी पीएमसी बँक प्रकरणी सुनावणी पुढे ढकल्याने खातेदारांनी हायकोर्टाबाहेर घोषणाबाजी केली. आरबीआय चोर है, हमारा पैसा वापस कर दो आरबीआय अशा घोषणा देण्यात आल्या. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होती. या सुनावणीत काय होणार याकडे खातेदारांचं लक्ष लागलं होतं. अशात ही सुनावणी ४ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आरबीआय विरोधात खातेदारांनी घोषणाबाजी केली.

English summary :
PMC Bank Scam : A hearing was held in the Mumbai High Court today regarding the financial scam in PMC Bank. The next hearing is now scheduled for December 7. For more latest news in Marathi follow Lokmat.com. Stay updated.


Web Title: PMC bank scam : Appointment of RBI Retired Officer as Bank Administrator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.